अशोक खरात प्रकरण! तत्काळ आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या, मुख्यमंत्र्यांचे चाकणकरांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 19:50 IST2026-03-20T19:49:50+5:302026-03-20T19:50:09+5:30

रुपाली चाकणकर या अशोक खरात यांच्या चरणी लीन झाल्याचे फोटो समोर आल्याने नैतिकतेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे

Ashok Kharat case! Resign immediately from the post of Commission Chairman, Chief Minister orders Chakankar | अशोक खरात प्रकरण! तत्काळ आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या, मुख्यमंत्र्यांचे चाकणकरांना आदेश

अशोक खरात प्रकरण! तत्काळ आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या, मुख्यमंत्र्यांचे चाकणकरांना आदेश

पुणे: भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे. अटकेनंतर खरातचे अनेक बड्या नेत्यांसोबतचे संबंध उघड झाले आहेत. मात्र, महिलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरात यांच्या चरणी लीन झाल्याचे फोटो समोर आल्याने नैतिकतेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. खरातची पाद्यपूजा करतानाचे फोटो व्हायरल झाल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली आहे. या सर्व घडामोडीनंतर मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर याना तत्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. 

दिवसभर सुरु असलेल्या घडामोडींवर चाकणकर यांनी नंतर प्रतिक्रिया देईल असे माध्यमांना उत्तर दिले होते. तसेच राष्ट्रवादीचे नेतेही योग्य वेळी बोलेन म्हणत विषय टाळत होते. अखेर चाकणकर यांनी पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. 

दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरुन रूपाली चाकणकर यांना हटविण्यात यावे. बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात आणि चाकणकर यांना समोरासमोर बसवून चौकशी करा आणि त्यांची नार्को टेस्ट करावी. तसेच त्यांना अटक झाली पाहिजे,अशी मागणी उध्दवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी २ सप्टेंबर २०२४ ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वत:ची अनामिका ( बोट) कापून अशा पद्धतीने तंत्र-मंत्र करतात असं पीडित महिला सांगतात. सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान चाकणकर यांच्या हातावर जखम होती. हे गंभीर आहे” असेही त्यांनी सांगितले होते. 

अन्यथा उपोषणाला बसू 

सुनेत्रा पवारांनी रूपाली चाकणकर यांचा उद्या दुपारी बाजार बारा वाजेपर्यंत राजीनामा घ्यावा अन्यथा आम्ही त्यांच्या घरासमोर उपोषणाला बसू असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. तसेच महायुतीने आमची फसवणूक केली असल्याचा आरोप देखील ओबीसी आरक्षणावरून हाके यांनी केला आहे.

Web Title : अशोक खरात विवाद: रूपाली चाकणकर को इस्तीफे का आदेश

Web Summary : अशोक खरात पर आरोपों और रूपाली चाकणकर की उनके साथ तस्वीरें सामने आने के बाद, मुख्यमंत्री ने उन्हें राज्य महिला आयोग के प्रमुख पद से इस्तीफा देने का आदेश दिया है। विपक्षी दलों ने नैतिक चिंताओं के कारण उनके इस्तीफे की मांग की।

Web Title : Rupali Chakankar Ordered to Resign Over Ashok Kharat Controversy

Web Summary : Following allegations against Ashok Kharat, and photos surfacing of Rupali Chakankar with him, the Chief Minister has ordered her resignation as head of the State Women's Commission. Opposition parties demanded her resignation due to ethical concerns.