शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
2
कर्नाटकात काँग्रेसचे संकट टळले? डीके शिवकुमार यांनी दिले संकेत, म्हणाले, "मला घाई नाही..."
3
लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून केली हत्या, मृतदेह कारमध्ये नेऊन ठेवला आणि झोपी गेला; दारूमुळे...
4
IND vs SA: रोहित शर्मासोबत सलामीला कोण? टीम इंडियाकडे 'हे' दोन पर्याय, कुणाला संधी?
5
Putin: रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पुतिन सकारात्मक; पण झेलेन्स्कींसमोर ठेवली 'अशी' अट!
6
तुमचे जुने आणि फाटकी अंतर्वस्त्रे देशाच्या अर्थव्यवस्थेचं सिक्रेट सांगतात! काय आहे 'मेन्स अंडरवेअर इंडेक्स'?
7
Mumbai Crime: "पैशांसाठी आई मला शेजाऱ्यांकडे पाठवायची अन्..."; दहावीतील विद्यार्थिनीचा धक्कादायक खुलासा!
8
Kapil Sharma : कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीत अटक
9
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लेकीचं केलं बारसं, ठेवलं हे युनिक नाव
10
ड्रोन हल्ल्यात ३ चीनी इंजिनिअर ठार, अफगाणिस्तानच्या सीमेजवळ सोन्याच्या खाणीत काम करत होते
11
बँक, शेअर, डिविडेंड, इन्शुरन्स.... आता सिंगल पोर्टलवर मिळणार दावा न केलेला पैसा, काय आहे सुविधा?
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
14
महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत झालाय खडखडाट; गेमचेंजर योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर वाढतोय ताण
15
Astrology: राहू पूर्वजन्माचे भोग भोगायला लावतो; तुम्हालाही आलेत का 'हे' वाईट अनुभव?
16
सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात घसरण; रेड झोनमध्ये सेन्सेक्स, निफ्टी; Asian Paints, Max Health, Eicher टॉप लुझर्स
17
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार! कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होणार? जगप्रसिद्ध ब्रोकरेज फर्मचा मोठा दावा
18
९० रशियन जहाजांचा गुप्तपणे सागरी प्रवास, ३० जहाजं भारतात पोहोचली; खळबळजनक रिपोर्ट, नेमकं काय घडलं?
19
Crime: विम्याचे ५० लाख हडपण्यासाठी पुतळ्यावर अंत्यसंस्कार, एका चुकीमुळे फसले! दोघांना अटक!
20
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
Daily Top 2Weekly Top 5

यमाई शिवरी येथे पालखीचे उत्साहात स्वागत;माऊलींच्या पादुका व यमाई देवीचा अलौकिक भेट सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 15:44 IST

येथील विसाव्याला विशेष महत्त्व असून या ठिकाणी आळंदी येथून पालखीने वारीसाठी प्रस्थान केल्यानंतर प्रथमच माऊलींच्या पादुका पालखीतून खाली घेऊन त्या यमाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात नेल्या जातात.

जेजुरी - श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा श्री संत सोपान काकांच्या सासवड नगरीचा दोन दिवसाचा पाहुणचार उरकून मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी नगरीकडे सकाळी ७वाजता मार्गस्थ झाला. दुपारी १ वाजता श्री क्षेत्र यमाई शिवरी येथे विसावा संपन्न झाला.यावेळी विविध मान्यवर,ग्रामस्थ,भाविकांच्या वतीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले.पोलिस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे,गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ,निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे,सारिका इंगळे,दत्तात्रेय झुरंगे,बबनराव कामथे,सरपंच प्रमोद जगताप,यमाई माता देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष नवनाथ कामथे,उपाध्यक्ष वासुदेव लिंबोरे,राजेंद्र क्षिरसागर,ज्ञानेश्वर कामथे,धनंजय कामथे ग्रामसेविका शीतल भुजबळ,तुकाराम कांबळे यांच्यासह विविध मान्यवरांनी स्वागत केले. यावेळी सासवडचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी,जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस,पोलिस पाटील,देवस्थान,ग्रामपंचायत पदाधिकारी,स्थानिक स्वयंसेवक यांनी दर्शनाची व्यवस्था पाहिली. येथील विसाव्याला विशेष महत्त्व असून या ठिकाणी आळंदी येथून पालखीने वारीसाठी प्रस्थान केल्यानंतर प्रथमच माऊलींच्या पादुका पालखीतून खाली घेऊन त्या यमाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात नेल्या जातात.येथे अभिषेक,महापूजा,महानैवेद्य आदी विधी संपन्न होतात.यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ,सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे,स्वामीदास गणेशांनंद महाराज सर्व विश्वस्त उपस्थित होते. शिवरी, खळद, एखतपुर, मुंजवडी, खानवडी, वाळुंज,निळुंज, शिंदेवाडी, तक्रारवाडी, पांगारे, भाटमळवाडी सह परिसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Maharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५PandharpurपंढरपूरIndian Festivalsभारतीय उत्सव-सण