शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari 2025 : संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा बारामती तालुक्यात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:38 IST

- सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी ३ वाजता पाहिले अश्वरिंगण पार पडेल.

सोमेश्वरनगर : संत तुकाराम महाराज यांचे अभंग गात संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याने बुधवार (दि.२५) सायंकाळी बारामती तालुक्यात प्रवेश केला. तालुक्याच्या सीमेवर निंबुत ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. उद्या दि. २६ रोजी सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी ३ वाजता पाहिले अश्वरिंगण पार पडेल.

पालखी सोहळ्याचे निंबुत येथे माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, ‘सोमेश्वर’चे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांच्या हस्ते रथाच्या बैलांचे पूजन करण्यात आले. सोहळाप्रमुख त्रिभुवन महाराज गोसावी यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच निर्मला काळे, उपसरपंच अमरसिंह काकडे, सदस्य नंदकुमार काकडे, मदन काकडे, सुमित काकडे, नायब तहसीलदार स्वाती गायकवाड, विस्तार अधिकारी राजेंद्र चांदगुडे, ग्रामसेवक चंद्रशेखर काळभोर व ग्रामस्थ उपस्थित होते.

निंबुत गावच्या सीमेपासून पालखी खांद्यावरून विठ्ठल मंदिरात नेण्यात आली. या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आरती करण्यात आली. पालखी दर्शनासाठी विठ्ठल मंदिरात ठेवण्यात आली होती. या ठिकाणी वारकऱ्यांनी राम कृष्ण हरीचा गजर केला. निंबुत ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. सतीशभैय्या कल्याणकारी संघाच्या वतीने रेनकोट, केळी, बिस्किटे वाटप करण्यात आले. होळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्ञानदीप राजगे, डॉ.कर्णवीर शिंदे, डॉ.प्रज्ञा -खोमणे-नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचार, पाणी शुद्धीकरण, तसेच परिसरातील हॉटेल तपासणी केली.

निंबुत, निंबुत छपरी, लक्ष्मीनगर, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, रासकरमाळ, फरांदेनगर परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. बा.सा. काकडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दीपाली ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर पालखी सोहळ्याचे स्वागत केले. सोहळ्यात शंभरहून अधिक दिंड्या आहेत. सतीश काकडे यांच्या वतीने निंबुत ते पंढरपूरच्या दरम्यान वारकऱ्यांसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे अधिकारी सचिन काळे, पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे आणि कर्मचाऱ्यांनी पालखीसाठी चोख बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५PandharpurपंढरपूरIndian Festivalsभारतीय उत्सव-सण