शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

Ashadhi Wari: माऊलींच्या पालखीत सिलेंडरने घेतला पेट; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 15:12 IST

पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचत जवानांनी पेटलेला सिलेंडरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला...

पुणे : आज सकाळी सुमारे दहा वाजता सासवड-जेजुरी रस्ता, वाळुंज फाटा या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गस्थ होत असताना पुढे दिंडी क्रमांक ७८ मधील वारकऱ्यांचा स्वयंपाक सुरु असताना अचानक घरगुती सिलेंडरने पेट घेतल्याची घटना घडली होती. तिथे असलेल्या वारकऱ्यांनी वाळू मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पालखीमध्ये बंदोबस्तावर तैनात असलेल्या अग्निशमन वाहनास संपर्क साधण्यात आला होता. पुणेअग्निशमन दलाचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचत जवानांनी पेटलेला सिलेंडरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला. 

पुणे अग्निशमन दलाचे वाहन गेली कित्येक वर्ष आळंदी ते पंढरपुर माऊलींच्या सुरक्षतेकरिता तसेच आग व आपत्कालिन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी म्हणून अग्निशमन अधिकारी व जवानांसह तैनात असते. इतर महानगरपालिका, पीएमआरडीए व नगरपालिका व इतर अग्निशमन वाहनेदेखील बंदोबस्ताकरिता असतात. आज घडलेल्या घटनेमुळे पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने उपस्थित वारकरी समुदाय यांनी जवानांचे आभार मानले.

पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी ही अधिकारी व जवानांचे कौतुक केले. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, वाहनचालक नारायण जगताप, तांडेल विलास दडस, फायरमन श्री बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले व अटेंडंड युवराज गवारी यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :PuneपुणेFire Brigadeअग्निशमन दलsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी