शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
3
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
4
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
6
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
7
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
8
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
9
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
10
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
11
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
12
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
13
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
14
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
15
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
16
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
17
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
18
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
19
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
20
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari 2025 : सुरुवातीला वारीसोबत बैलगाड्या, १९८५ नंतर टॅक्टर, ट्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:21 IST

- पूर्वी बैलगाडीत वारकऱ्यांना जेवणासाठी लागणारे धान्य, कपडालत्ता घेऊन जावे लागायचे. आता प्रत्येक दिंडीत वाहनांची सोय झाल्यामुळे वारकऱ्यांची सोय हायटेक झाली आहे.

- अंबादास गवंडीपुणे : डोक्यावर तुळशी वृंदावन, कपाळावर टिळा, हातामध्ये टाळ आणि मृदंग, मुखामध्ये हरिनामाचा गजर करत शेकडो वर्षांपासून वारी सुरू आहे. आता वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये भक्ती आणि भाव तोच आहे; परंतु १९८५ वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये टॅक्टर, ट्रक व इतर वाहने दाखल झाले. पूर्वी बैलगाडीत वारकऱ्यांना जेवणासाठी लागणारे धान्य, कपडालत्ता घेऊन जावे लागायचे. आता प्रत्येक दिंडीत वाहनांची सोय झाल्यामुळे वारकऱ्यांची सोय हायटेक झाली आहे.महाराष्ट्र हा भक्ती आणि शक्ती गुणाने संपन्न, समृद्ध आहे. याला इतिहास आणि भूगोल साक्षीदार आहे. याच साक्षीने गेल्या शेकडो वर्षांपासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा देहू, आळंदीवरून पंढरपूरला जातात. वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांनी संख्या १९८० नंतर वाढत गेली आणि आजही ती वाढतच आहे; परंतु पूर्वी वारकऱ्यांना जेवणासाठी लागणाऱ्या धान्य, वस्तू ठेवण्यासाठी बैलगाड्यांचा सर्रास वापर होत होता.

कालांतराने तंत्रज्ञानाच्या युगात विविध वाहने उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे वारीमध्ये टॅक्टर, ट्रक अशी वाहने मोठ्या प्रमाणात सामील झाली. वाहने उपलब्ध झाल्यामुळे वारकऱ्यांना लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी सोय झाली असून, गॅस सिलिंडरपासून चहा पावडरपर्यंत सर्व वस्तू सुरक्षित राहतात; परंतु पूर्वीच्या काळी जोरदार पाऊस आल्यावर बैलगाडीला बांधण्यात आलेल्या राहुट्यांतून पाणी यायचे. त्यामुळे सर्व वस्तू भिजून जायचे. यामुळे वारकऱ्यांचे हाल होत असे; परंतु वाहनांमुळे सोयीचे झाल्याने वारकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे. रस्त्यावरील पाणी टँकर झाले गायब वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोयी व्हावी, यासाठी २००५ पर्यंत प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर स्थानिक प्रशासनाकडून पाण्याचे टँकर उभे केले जात होते. त्याच ठिकाणी वारकरी अंघोळ करायचे आणि पुढे जायचे. आता प्रत्येक गावात शाळेमध्ये वारकऱ्यांसाठी राहण्याची, जेवणाची सोयी केली जाते. अंघोळीसाठी गरम पाण्यापासून जेवणासाठी सर्व सोय केली जाते. त्यामुळे पाण्याचे टँकर कमी होत गेले. अन् मळकट वारी गायब झाली  पूर्वी वारीला जाताना वारकरी एकच धोतर आणि सदरा घेऊन जायचे. त्यामुळे दोन-तीन दिवस तोच धोतर आणि सदरा घालायचे; परंतु आता वाहनांमध्ये कपडे ठेवण्याची सोय झाल्याने प्रत्येक वारकरी किमान दहा ते पंधरा जोड धोतर आणि सदरा घेऊन जातात. शिवाय बारामती, इंदापूर आणि माळीनगर या ठिकाणी वारकऱ्यांच्या कपडे धुण्याची सोय स्थानिक नागरिकांकडून केली जाते. परिणामी कितीही पाऊस आला तरी दररोज कपडे बदलल्यामुळे मळकट, कळकट वारकरी दिसायचे बंद झाले.

वारी म्हणजे वारकऱ्यांच्या शिस्तीचा आणि विठ्ठलभक्तीच्या संगम आहे. मी गेल्या ३२ वर्षांपासून वारी करत आहे. पूर्वीच्या काळी वारकऱ्यांना सोयी नव्हत्या. त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या; परंतु आता प्रत्येक मुक्कामी सोय आहे. शिवाय दिंड्यांमध्ये वाहने आहेत. त्यामुळे दैनंदिन लागणाऱ्या वस्तू सुरक्षित राहतात. वारीला लोकांची गर्दी वाढली तरी वारकऱ्यांमध्ये शिस्त, वागणे, बोलणे, मुखात हरिनाम, भाव आणि भक्ती तोच आहे.  -सतीश गव्हाणे, वारकरी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025