शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari 2025: पहिल्यांदाच पालखी मार्गावर बारा ठिकाणी जर्मन हँगर मंडप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 10:27 IST

- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची माहिती

पुणे : पालखी सोहळ्यात पावसामुळे वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पहिल्यांदाच पालखी मार्गावर बारा ठिकाणी जर्मन हँगर मंडप उभारण्यात येणार आहेत. पाऊस आला तरी वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षित राहू शकतात, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आप्पासाहेब गुजर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, पालखी सोहळ्याच्या मुक्कामांच्या ठिकाणी ग्रामपंचायतींना स्वच्छता आणि आरोग्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीमध्ये वाढ केली आहे. तीन लाखांहून आता पाच लाख रुपये केली आहे. तर दुपारच्या विसाव्यासाठी दोन लाख आणि लहान विसाव्यासाठी ग्रामपंचायतींना एक लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. शासनाकडे आपण २५ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यापैकी जवळपास सत्तर टक्के निधी शासनाने दिला आहे. त्याचे ग्रामपंचायतींना वितरण आजच सुरू होईल. जिल्हा परिषदेकडून दिंडी प्रमुखांना तीन हजार औषधांचे कीट वाटप करण्यात येईल, ज्यामध्ये १३ प्रकारचे औषधे आणि ती वापरण्यासाठी माहिती पत्रक दिले जाणार आहे. सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर २५० कामगारांकडून साफसफाईचे काम हाती घेण्यात येईल.

शौचालयांची व्यवस्था

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा - १,८०० (जाताना) - ३०० (येताना)

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा - १,२०० (जाताना) - २०० (येताना)

श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा - ३०० (जाताना)

इतर पालखी सोहळे - २५०

एकूण - ४,०५०---------

हिरकणी कक्ष - ५८

पिण्याचे पाणी टँकर - २००

टँकर भरणा केंद्र - ९८

आरोग्य केंद्र, उपकेंद्र, खासगी रुग्णालयात - १० टक्के आयसीयू खाटा राखीव

रुग्णवाहिका - १७१

पाण्याचे स्रोत तपासणीसाठी - १,३३५

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPandharpurपंढरपूरAlandiआळंदीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड