शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा जेलातून जामीन मिळताच गल्लीत हवा; त्याच गल्लीत गुंडांची पोलिसांकडून वरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:35 IST

या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीत तक्रारही केली, परंतु पोलिसांनी कारवाई केलीच नाही

- किरण शिंदे पुणे - येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गाड्यांची तोडफोड आणि दहशत माजवल्याप्रकरणी प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे टोळीवर मोक्काची कारवाई केली होती. गुड्या कसबे मंगळवारी (दि. ७) सायंकाळी येरवडा कारागृहातून बाहेर आला. तो बाहेर येताच त्याने व त्याच्या समर्थकांनी काढलेली रॅली सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र त्याच्या समर्थनार्थ काढण्यात आली. रात्रीच्या वेळी या टोळक्याने संपूर्ण परिसरात दहशत माजवली होती. नागरिकांना धमकावले होते. या झालेल्या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीत तक्रारही केली, परंतु पोलिसांनी कारवाई केलीच नाही असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे.मात्र दोन दिवसानंतर भाईच्या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल झाला. पेपरात, टीव्ही चॅनेलमध्ये बातम्या आल्या. आणि त्यानंतर पोलीसही जागे झाले. रॅलीत सहभागी झालेल्या भाईच्या पंटरची शोधाशोध सुरु झाली. पोलीस आपल्याला शोधतायत म्हटल्यावर भाई अंडरग्राउंड झाला. पंटरची ही पळापळ झाली. पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला आणि भाईच्या रॅलीत सहभागी झालेल्या नऊ जणांना ताब्यात घेतलं. अजूनही काहींचा शोध पोलीस घेतायत. गुड्ड्या भाई मात्र अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस त्याच्याही शोधात आहेतच. मात्र जे हाती लागलेत त्यांची पोलिसांनी चांगलीच वरात काढली. ज्या परिसरात हे पंटर भाईच्या रॅलीत सहभागी झाले होते, ज्या ठिकाणी त्यांनी दहशत माजवली होती. त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांची वरात काढली.  प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा), दीपक मदने, करण सोनवणे, अनिकेत कसबे, अंश पुंडे, अजय कसबे, सागर कसबे, अभिजीत ढवळे, राहुल रसाळ, नन्या कांबळे, रोशन पाटील आणि तुषार पेठे यांच्यासह ३५ ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई लहू गडमवाड यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.समर्थनार्थ काढलेली रॅली उलटलीचार वर्षापूर्वी तळोजा कारागृहातून बाहेर पडलेल्या गुंड गजा मारणे याच्या रॅलीनंतर शहरातील गुन्हेगारी ढवळून निघाली होती. त्यानंतरच शहरात टोळ्यांवर मोक्काचे सत्र सुरू झाले होते. त्यानंतर सुमारे २४० टोळ्यांवर मागील चार वर्षांत मोक्का अंतर्गत कारवाई झाली. त्यापैकी एका मोक्काच्या कारवाईत कारागृहात असलेला प्रफुल्ल कसबे जामिनावर सुटला. मात्र त्याच्या समर्थनार्थ काढलेली रॅली ही त्याच्यावर उलटली आहे. पोलिसांनी याप्रकरणात त्याला करण्याची तजवीज देखील ठेवली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय