तब्बल १ कोटींचे बीटकॉईन्स घेतले; परताव्यासाठी फोन केला अन् प्रतिसाद नाहीच

By भाग्यश्री गिलडा | Published: May 14, 2023 04:34 PM2023-05-14T16:34:11+5:302023-05-14T16:34:18+5:30

सायबर पोलीस ठाण्यात डॅनियल कूपर आणि अलेक्झांडर हूडहेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

As many as 1 Crore Bitcoins taken Called for refund and no response | तब्बल १ कोटींचे बीटकॉईन्स घेतले; परताव्यासाठी फोन केला अन् प्रतिसाद नाहीच

तब्बल १ कोटींचे बीटकॉईन्स घेतले; परताव्यासाठी फोन केला अन् प्रतिसाद नाहीच

googlenewsNext

पुणे: ट्रेडिंग वेबसाइटवरून गुंतवणूक केली तर मोठ्या प्रमाणात त्याचा मोबदला मिळेल असे सांगून १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. मोबाईल आणि ईमेलद्वारे संपर्क करून ही फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिश्चंद्र राजाराम काळे (४६, रा. वडगाव शेरी) यांनी सायबर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रेडेक्स डॉट कॉम या ट्रेडिंग साईटमधून बोलत असल्याचे सांगून काळे यांचा विश्वास संपादन केला. सदर वेबसाईटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा देण्याचे त्यांना आमिष दाखवले. त्यांनतर काळे यांच्याकडील एकूण १ कोटी १२ लाख ६० हजार किमतीचे २.७ बिटकॉईन्स घेतले. मात्र बिटकॉईन्स घेतल्यावर त्याचा कोणताही परतावा दिला नाही आणि संपर्क केला असता प्रतिसाद दिला नाही म्हणून आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात डॅनियल कूपर आणि अलेक्झांडर हूडहेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील या करत आहेत.

Web Title: As many as 1 Crore Bitcoins taken Called for refund and no response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.