Forbes List | बारामतीची कन्या फोर्ब्सच्या यादीत; जाणून घ्या कोण आहे आर्या तावरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 04:35 PM2022-05-04T16:35:19+5:302022-05-04T16:44:05+5:30

सध्या फ्यूचरब्रीक्स २२ वेगवेगवेळ्या बांधकाम प्रकल्पावर काम करीत आहे

arya taware of baramati is on the list of forbes know the details | Forbes List | बारामतीची कन्या फोर्ब्सच्या यादीत; जाणून घ्या कोण आहे आर्या तावरे

Forbes List | बारामतीची कन्या फोर्ब्सच्या यादीत; जाणून घ्या कोण आहे आर्या तावरे

googlenewsNext

बारामती (पुणे) : अवघ्या २१-२२ व्या वर्षी फ्यूचर ब्रीक्स स्टार्टअप सुरु करून बारामतीकर आर्या कल्याण तावरे या युवतीने जागतिकस्तरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या या कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या फोर्ब्स मासिकाने दखल घेतली असून युरोपातील आर्थिक क्षेत्रातील ३० वषार्खालील ३० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये आर्याचा समावेश झाला आहे.

काटेवाडी (ता. बारामती) येथील असणाऱ्या आर्याने लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना भांडवल पुरवठा करणारा हा स्टार्टअप सुरू केला आहे. फ्यूचरब्रीक्स असं नाव असणाऱ्या या स्टार्टअपचे आजचे बाजारमुल्य ३२.७ कोटी पौंड इतके आहे. सध्या फ्यूचरब्रीक्स २२ वेगवेगवेळ्या बांधकाम प्रकल्पावर काम करीत आहे.

वयाच्या २२ व्या वर्षी आर्याने फ्यूचरब्रीक्स स्टार्टअप सुरु केला. त्यावेळी ती नुकतीच लंडनच्या युनिर्व्हसिटी कॉलेजमधून बाहेर पडली होती. लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना भांडवल पुरवठा करणारा हा स्टार्टअप होता. याचबरोबर या क्षेत्रातील विशेषज्ञांना तसेच गुंतवणूकदारांना एकत्र आणणारे एक पोर्टल म्हणूनही या स्टार्टअपने विशेष भुमिका बजावली.

प्रतिष्ठित अशा फोर्ज मासिकाने आयार्ला आपल्या प्रभवशाली व्यक्तिमत्वांच्या यादीत स्थान दिले आहे. युरोपातील आर्थिक क्षेत्रातील ३० वषार्खालील ३० प्रभावशाली व्यक्तीमत्वांचा या यादीत समावेश आहे.

Web Title: arya taware of baramati is on the list of forbes know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.