शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

सीबीएसईच्या शाळांमध्ये ‘कला शिक्षण’ बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 12:31 PM

शाळांमधील शिक्षण आनंददायी व्हावे म्हणून सीबीएसईकडून काही बदल करण्यात येत आहेत.

ठळक मुद्देयेत्या शैक्षणिक वषार्पासून अंमलबजावणी : पाककलेचीही शिक्षण देणारपहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात संगीत, नृत्य, नाटक, पाककला बंधनकारक करण्याचा निर्णयविद्यार्थ्यांच्या वर्षभरातील एकूण अध्ययनाचे मूल्यमापन केले जाणार

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कलाशिक्षण (संगीत, नृत्य, नाटक, पाककला) बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच करणार आहे. शाळांनी दर आठवड्याला किमान दोन तास कला शिक्षणासाठी द्यावेत असे सीबीएसईकडून स्पष्ट केले आहे.शाळांमधील शिक्षण आनंददायी व्हावे म्हणून सीबीएसईकडून काही बदल करण्यात येत आहेत. शाळांचे मुख्याध्यापक, राष्ट्रीय शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) व कला क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून हे बदल करण्यात येत आहेत. कला विषयांची कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही, मात्र विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील एकूण अध्ययनाचे मूल्यमापन केले जाणार आहे. कला शिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांकडून काही प्रयोग, प्रकल्प करून घेतले जाणार आहेत. तसेच कलांची मुलभूत ओळख करून दिली जाईल असे सीबीएसईकडून स्पष्ट केले आहे. कला शिक्षणामध्ये त्यांना काहीतरी शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना त्यातून आनंद मिळावा अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हे शिक्षण समावेशक, संवादी व प्रयोगशील अशी अपेक्षा सीबीएसईने काढलेल्या परिपत्रकामध्ये व्यक्त केली आहे.कला शिक्षणामध्ये सीबीएसईने चार प्रकारांना प्राधान्य दिले आहे. त्यात संगीत, नृत्य, दृश्यकला व नाटक यांचा समावेश आहे. तर सहावी ते आठवीच्या विद्याार्थ्यांना पाककला हा विषय शिकवणार आहे. पाककलेच्या विषयामध्ये पौष्टिक खाद्य, भारतातील पिके, वेगवेगळ्या प्रकारची धान्य, भाज्या, तेल कसे तयार होते, शेतीची योग्य पद्धत आदींचीही माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर विविध राज्यांतील वैविध्यपूर्ण खाद्यासंस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेartकलाSchoolशाळाCBSE Examसीबीएसई परीक्षाEducationशिक्षणCentral Governmentकेंद्र सरकार