अटक आराेपीकडून ससून रुग्णालयात तोडफोड, बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 11:53 IST2024-01-12T11:53:04+5:302024-01-12T11:53:29+5:30

महापुरुषांच्या पुतळ्याच्या विटंबनेवरून रोहित गुप्ता याला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली...

Arrested Sassoon Hospital vandalism by ARP, case registered in Bundagarden Police Station | अटक आराेपीकडून ससून रुग्णालयात तोडफोड, बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अटक आराेपीकडून ससून रुग्णालयात तोडफोड, बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणले असता त्याने आपत्कालीन रुग्णसेवा विभागात तोडफोड केली. गुरुवारी (दि. ११) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. रोहित गुप्ता असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाने दिल्या आहेत.

अधिक माहितीनुसार, महापुरुषांच्या पुतळ्याच्या विटंबनेवरून रोहित गुप्ता याला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पोलिसांनी आणले होते. त्यावेळी त्याने प्रथम पळून जाण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला पकडून आपत्कालीन विभागात आणले. त्यावेळी त्याने पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत तेथील काचांची तोडफोड केली. त्यामुळे गुप्ता विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाने दिली.

Web Title: Arrested Sassoon Hospital vandalism by ARP, case registered in Bundagarden Police Station