शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

सायकल चोरणाऱ्याला अटक, पोलीस प्रशासनाला वाढतेय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 02:40 IST

स्मार्ट सिटी योजना : वाहनचोरी रोखण्यात पोलिसांना यश

पुणे : पुणे शहरातून दररोज साधारण ८ ते १० वाहने चोरीला जातात़ त्यामध्ये दुचाकींबरोबरच चारचाकींचाही समावेश असतो़ वाहनचोरी रोखण्यामध्ये पोलिसांना यश येत नसले, तरी त्याबाबत पोलीस फारसे गंभीर नसतात़ पण, स्मार्ट सिटी योजनेतील एक सायकलचोरीची फिर्याद मिळाल्यानंतर, कोंढवा पोलिसांनी ती गांभीर्याने घेऊन सायकलचोराला पकडले़ त्याच्याकडून सायकलही जप्त करण्यात आली आहे़

महादेव विजयकुमार मुनळे (वय १९, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत, सायकल पुरवठा करणाºया कंपनीचे व्यवस्थापक आदर्श केदारी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, उपनिरीक्षक संतोष शिंदे, हवालदार राजस शेख, शिंदे, अमित साळुंके, पृथ्वीराज पांडुळे, योगेश कुंभार, अजीम शेख आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी कोंढवा भागात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी रिजवान नईम मेमन (वय १९, रा. सुंदर विहार सोसायटी, मिठानगर, कोंढवा खुर्द) यालाताब्यात घेतले. अटकेत असलेल्या मेमनने घरफोडीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. ५९ हजारांची रोकड जप्त केली.२,५०० सायकली स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उपलब्धस्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात २,५०० सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सायकलींना जीपीएस यंत्रणा लावण्यात आलेली आहे. सायकल वापरणाºयांकडून प्रतिमहा ९९ रुपये भाडे आकारण्यात येते. शहराच्या मध्य भागातून एक सायकल चोरीला गेली होती. याबाबतची तक्रार कोंढवा पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. जीपीएस यंत्रणा, तसेच कंपनीकडे नोंद असलेल्या मोबाईल क्रमांकावरून मुनळे याचा पोलिसांकडून माग काढण्यात आला. मुनळेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक सायकल जप्त करण्यात आली आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस