मासे विक्रीवरुन वाद, एकावर कोयत्याने गंभीर वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 13:00 IST2022-10-29T12:59:04+5:302022-10-29T13:00:05+5:30
राजगुरुनगर: आमचेकडे आलेले गिऱ्हाईक तुझ्याकडे का घेऊन जातो असे म्हणत दोन मासे विक्री करणाऱ्यामध्ये वाद झाला. यानंतर मासे कापण्याच्या सुऱ्याने एकाच्या डोक्यात ...

मासे विक्रीवरुन वाद, एकावर कोयत्याने गंभीर वार
राजगुरुनगर: आमचेकडे आलेले गिऱ्हाईक तुझ्याकडे का घेऊन जातो असे म्हणत दोन मासे विक्री करणाऱ्यामध्ये वाद झाला. यानंतर मासे कापण्याच्या सुऱ्याने एकाच्या डोक्यात गंभीर वार केल्याची घटना (दि २८ ) रोजी राजगुरुनगर मध्ये घडली. सोयल रफिक मोमीन (वय २६ रा. मोमीन आळी राजगुरूनगर ता. खेड) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव असून आमन मोमीन व सुफियान मोमीन उर्फ दुध्या रा. राजगुरूनगर (ता.खेड ) यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मासे विक्रीचे स्टालचे दुकानावर मासे विक्री करीत असताना शेजारील मासे विक्री करणारा दुकानदार आमन मोमीन व सुफियान मोमीन उर्फे दुध्या यांनी तू आमच्याकडे आलेले गिऱ्हाईक तुझ्याकडे का घेऊन जातो असे म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरूवात केली. यानंतर आमन मोमीन याने मासे कापण्याच्या सुऱ्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक भारत भोसले करत आहे.