Pune: ‘मजाक’मध्ये झाले भांडण, मध्यस्थांवरच चाकूने वार; लोहियानगरातील घटना
By नम्रता फडणीस | Updated: October 17, 2023 18:14 IST2023-10-17T18:13:46+5:302023-10-17T18:14:34+5:30
मध्यस्थी करणाऱ्या तिघांवर एकाने चाकुने वार केला...

Pune: ‘मजाक’मध्ये झाले भांडण, मध्यस्थांवरच चाकूने वार; लोहियानगरातील घटना
पुणे : चेष्टा मस्करीतून सुरु झालेल्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तिघांवर एकाने चाकुने वार केला. ही घटना लोहियानगर भागात घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी आफ्रिदी अरिफ सय्यद (वय २३) याला अटक केली आहे. याबाबत शहजाद खुर्शीद अली सय्यद (वय २९, रा. सूर्यकिरण मंडळाजवळ, लोहियानगर, गंज पेठ) याने फिर्याद दिली.
अधिक माहितीनुसार, आफ्रिदी हा शहजादच्या ओळखीचा आहे. दोघे एकाच भागात राहायला आहेत. आफ्रिदी आणि मुजीब खान यांच्यात चेष्टा मस्करी करण्यावरून भांडणे सुरू झाली. त्यावेळी शहजादने त्यांची भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. आफ्रिदीने त्याला शिवीगाळ करुन चाकू उगारला. शहजादवर वार केला असता त्याने ते हुकविला. त्यावेळी शहजादचा लहान भाऊ आफताबने आरोपी आफ्रिदीला जाब विचारला. आफ्रिदीने आफताबच्या पोटावर चाकुने वार केले. तेथे थांबलेल्या शहजादचा लहान भाऊ उबेद मदतीसाठी धावला. आफ्रिदीने उबेदवर चाकुने वार केला. आफ्रिदीने केलेल्या हल्ल्यात शहजाद, त्याचे भाऊ आफताब, उबेद जखमी झाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत काळे तपास करत आहेत.