‘पार्टटाइम नोकरीला इच्छुक आहात का?’ टास्क फ्रॉडमध्ये साडेसहा लाखांचा गंडा

By भाग्यश्री गिलडा | Updated: August 19, 2023 13:05 IST2023-08-19T13:04:05+5:302023-08-19T13:05:52+5:30

सुरुवातीला ५०० रुपये मोबदला देऊन त्यांचा विश्वास संपादन केला....

'Are you interested in a part-time job?' Six and a half lakhs in task fraud | ‘पार्टटाइम नोकरीला इच्छुक आहात का?’ टास्क फ्रॉडमध्ये साडेसहा लाखांचा गंडा

‘पार्टटाइम नोकरीला इच्छुक आहात का?’ टास्क फ्रॉडमध्ये साडेसहा लाखांचा गंडा

पुणे : पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याबाबत ३३ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २१ जून २०२३ ते १८ ऑगस्ट २०२३ यादरम्यान घडला आहे. तक्रारदार व्यक्तीला अनोळखी क्रमांकावरून ‘पार्टटाइम वर्क फ्रॉम होम करण्यास इच्छुक आहात का?’ असा मेसेज आला. तक्रारदार व्यक्तीने होकार दिला असता वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून टेलिग्राम ग्रुपमध्ये सामावून घेतले. त्यानंतर सुरुवातीला ५०० रुपये मोबदला देऊन त्यांचा विश्वास संपादन केला.

प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार व्यक्तीकडून तब्बल ६ लाख ५१ हजार रुपये उकळले. काही कालावधीनंतर नफ्याचे पैसे मिळत नसल्याने विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उप निरीक्षक डीगोळे पुढील तपास करत आहेत.

Web Title: 'Are you interested in a part-time job?' Six and a half lakhs in task fraud