शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका अधिका-यांची मनमानी

By admin | Updated: January 12, 2015 02:32 IST

एका बाजूला महापालिका आर्थिक संकटात आहे. त्यामुळे विकासकामांना कात्री लावण्यात येत आहे.

हणमंत पाटील, पुणेएका बाजूला महापालिका आर्थिक संकटात आहे. त्यामुळे विकासकामांना कात्री लावण्यात येत आहे. त्याच वेळी महापालिकेतील ३० ते ३५ अधिकाऱ्यांना नियम डावलून सेवेसाठी अ‍ॅम्बेसिडर व कार देण्यात आल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. या मनमानी कारभारामुळे महापालिकेला रोज लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे. स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द होणार असल्याने महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे विकासकामांना कात्री लावण्यात येणार असून, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वर्गीकरण करण्याची नामुष्की ओढावली आहे. महापालिकेच्या वाहन धोरणानुसार केवळ विभागप्रमुख दर्जाच्या अधिकाऱ्यांना वाहनांचा वापर करण्यास परवानगी आहे. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त व विभागप्रमुख मिळून २५ ते ३० अधिकाऱ्यांना अ‍ॅम्बेसिडर व कार देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तत्कालीन आयुक्त व सहआयुक्त यांच्या तोंडी आदेशानुसार मर्जीतील अधिकाऱ्यांना आणखी ३० ते ३५ गाड्या वापरासाठी देण्यात आल्याचे माहिती अधिकारातून उजेडात आले आहे. त्यामुळे मनमानी कारभाराला चाप लावून पुणेकरांच्या पैशांतून झालेल्या उधळपट्टीची चौकशी करण्याची आवश्यकता आहे.