शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शहरात नव्या ५ पोलिस ठाण्यांना मंजुरी; पोलिस आयुक्तांच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 21:45 IST

८३० मनुष्यबळही मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : शहराचा विस्तार वाढत असून, पुणे ही ‘फ्युचर सिटी’ आहे. आयटी, उद्योग, शिक्षणासह विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या या शहराची वाढ विचारात घेऊन पुढील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुणे शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात येणार आहे. याशिवाय अतिरिक्त एक हजार पोलिस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ८ ऑगस्ट रोजी शहरात केली होती. त्यानुसार सोमवारी (दि. १५) गृहविभागासह वित्त विभागाकडून शहरात नव्या ५ पोलिस ठाण्यांसह २ स्वतंत्र झोन (पोलिस उपायुक्त) ला देखील मान्यता देण्यात आली.

नव्या पोलिस ठाण्यांसाठी ८३० मनुष्यबळ देखील मंजुर करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीसाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

राज्याच्या आजवरच्या इतिहासात इतर आयुक्तालयाच्या तुलनेत अवघ्या एक वर्षाच्या आतमध्ये तब्बल १२ पोलिस ठाण्यांच्या निर्मितीसह दोन झोन मंजूर झालेले पुणे पोलिस आयुक्तालय अव्वल ठरले आहे. पहिल्या टप्प्यात थेट ७ पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत फळाला आली. त्याठिकाणी काम करण्यासाठी शासनाने ८१६ पदांची मान्यता दिली होती. त्यानंतर आता पाच पोलिस ठाण्यांच्या निर्मितीला गृह व वित्त विभागाने हिरवा कंदील दिला असल्यामुळे नव्याने ८३० मनुष्यबळ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त संजय पाटील, डिसीपी राजलक्ष्मी शिवणकर आणि एसीपी विवेक पवार यांनी वेळोवेळी शासनाने पाठपुरावा केला.

नवी पोलिस ठाणे अशी..१) लोहगाव (विमानतळ)

२) नऱ्हे३) लक्ष्मीनगर (येरवडा)

४) मांजरी (हडपसर)५) येवलेवाडी (कोंढवा)

६) दोन झोन (पोलिस उपायुक्त)

पोलिस दलाचे कामकाज होणार सक्षम...

यापूर्वी गेल्या २० वर्षात पुणे पोलिसांकडून एकाही नवीन पोलिस ठाण्यांसंदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला नव्हता. त्यामुळे

वाढलेली लोकसंख्या, गुन्ह्यांचे बदललेले स्वरूप लक्षात घेता, शहरात नवीन पोलिस ठाण्यांसह मनुष्यबळाची गरज होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झालेल्या ७ पोलिस ठाण्यानंतर आता या ५ नवीन पोलिस ठाण्यांमुळे पुणे पोलिस दलाचे कामकाज सक्षम होणार आहे.नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील होतो. गृह विभागासह वित्त विभागाने आमच्या पोलिस ठाण्यांसह मनुष्यबळाची मागणी देखील मान्य केली आहे. ५ पोलिस ठाण्यांच्या उभारणीला हिरवा कंदील मिळाला असून, दोन स्वतंत्र झोन ला देखील परवानगी मिळाली आहे. येत्या महिनाभरात नवीन ५ पोलिस ठाणी कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस