शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

पुण्यात दोन दिवसांआड पाणी देण्याची वेळ येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 4:11 AM

पुणे शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेता शहराला दररोज किमान १३५० एमएलडी पाण्याची गरज आहे; परंतु महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आता केवळ दररोज ६३५ एमएलडी पाणी देण्याचा निर्णय दिला आहे.

पुणे : पुणे शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेता शहराला दररोज किमान १३५० एमएलडी पाण्याची गरज आहे; परंतु महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आता केवळ दररोज ६३५ एमएलडी पाणी देण्याचा निर्णय दिला आहे. हा निर्णय शहरावर अन्याय करणार असून, प्राधिकरणाच्या निर्णयाच्या विरोधात शासनाकडे अपील दाखल करणार आहोत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात होणार आहे.महापालिकेच्या शपथपत्राच्या आधारे ६३५ एमएलडीचा निर्णय शहराची लोकसंख्या ३९ लाख १८ हजार असून, तीनही कॅन्टोन्मेंटबोर्ड आणि शहरालगतची गावे अशी मिळून १ लाख ५८ हजार लोकसंख्या अशी एकूण ४० लाख ७६ हजार लोकसंख्या असलेल्याचे शपथपत्र महापालिकेच्या वतीने जलसंपत्ती प्राधिकरणाकडे सादर केले होते. या शपथपत्राच्या आधारे प्राधिकरणाने प्रतिदिन प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाणी देण्याचे निश्चित करून पुणे शहरासाठी वर्षाला ८.१९ टीएमसी पाणीपुरवठा करण्यात येईल, असा निर्णय गुरुवारी (दि.१३) रोजी दिला. यामुळे पुणे शहराला दररोज केवळ ६३५ एमएलडीच पाणी मिळणार आहे.सध्या १५०० ते १६०० एमएलडी पाणी : कपातीनंतर कसरतजलसंपदा विभागाने प्राधिकरणाचा आदेश पाळल्यास पुण्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होणार आहे. सध्या महापालिका १५०० ते १६०० एमएलडी पाणी उचलत आहे. त्यामुळे पुण्याला पुरेसा पाणीपुरवठा होत आहे.६३५ एमएलडीच पाणी मिळाले, तर आताच्या पुण्याच्या गरजेप्रमाणे तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. महापालिकेला शहराच्या अनेक भागांत पाणी पोहोचविण्यासाठी कसरत करावी लागणार.प्राधिकरणाच्या निर्णयावर आज तातडीने बैठकजलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने दिलेल्या निकालात महापालिकेने राज्यशासनाकडून पाण्याचा कोटा वाढवून घ्यावा अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार, तातडीने राज्यशासनास पत्र पाठविण्यात येणार असून, पुणे शहराचे पाणी कमी करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली जाणार आहे. शहरात सध्या दिवाळीपासून एक वेळ पाणीकपात सुरू असून, त्यासाठी महापालिकेस प्रतिदिन १३५० एमएलडी पाण्याची गरज आहे. २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या कालवा समितीच्या तातडीच्या बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुढील आदेश होईपर्यंत शहराला आवश्यक असलेले पाणी देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागास केल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय कायम ठेवण्यासह शहरासाठी पाणीकोटा वाढवून देण्याची विनंती राज्यशासनास केली जाईल. यासाठी शुक्रवार (दि.१४) रोजी तातडीने पक्षनेते, महापालिका आयुक्त सौरभ राव आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. यामध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.- मुक्ता टिळक, महापौरपुणेकरांनी किती सहन करायचंमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे नियम काय फक्त पुणे शहरासाठीच आहेत का, प्राधिकरणाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करीत शेतीसाठीदेखील नियम लागू करावेत. धरणे भरली असताना केवळ प्राधिकरण आणि शासन कर्त्यांच्या आचरटपणामुळे जर दोन-तीन दिवसांतून एकदा पाणी मिळणार असले, तर पुणेकरांनी किती सहन करायचे? याबाबत महापालिकेतील पदाधिकारी, राज्यातील सत्तेतील लोकांनी तातडीने निणर्य घेण्याची गरज आहे; अन्यथा शहरात गंभीर परिस्थिती निर्माण होईल.- विवेक वेलणकर,सजग नागरिक मंचप्राधिकरणाच्या निर्णयाची लवकरच अंमलबजावणीमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे शहरासाठी लोकसंख्येनुसार ८.१९ टीएमसी म्हणजे, दररोज ६३५ एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा जलसंपदा विभागाचा निर्णय कायम ठेवला आहे. कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहराची पाणीकपात करून, ११५० एमएलडीच पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु त्यानंतर महापालिकेकडून दररोज १३५० एमएलडीपेक्षा अधिक पाणी उचलले जात आहे. गेल्या काही दिवसांत, तर १५०० ते १५६६ एमएलडी पाणी उचलत आहेत; परंतु आता प्राधिकरणाने ६३५ एमएलडीच पाणीपुरवठा करण्याचा निर्णय दिला असून, या निणर्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल.- पांडुरंग शेलार, अधीक्षक अभियंता, खडकवासला प्रकल्प

टॅग्स :water shortageपाणीटंचाईPuneपुणे