Anyone in the state can apply for a house under Pradhan Mantri Awas Yojana | प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील कुठलाही व्यक्ती करू शकतो घरासाठी अर्ज : नितीन माने पाटील  

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील कुठलाही व्यक्ती करू शकतो घरासाठी अर्ज : नितीन माने पाटील  

ठळक मुद्देकेंद्र शासनाच्या वतीने २०१५ पासून सर्वांसाठी प्रधानमंत्री आवास योजना मंजूर

पुणे : केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यामध्ये आता पर्यंत केवळ त्या शहरात रहिवासी राहणाऱ्या व्यक्तीलाच अर्ज करता येतो. परंतु शासनाने आता राज्यातील कुठलाही व्यक्ती कोणत्याही शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज करता येणार असल्याची माहिती  पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले. 
           केंद्र शासनाच्या वतीने सर्वांसाठी घरे (नागरी) योजना- प्रधानमंत्री आवास योजना मंजूर करण्यात आली. सन  २०१५ रोजी सुरु ही योजना सुरू करण्यात आली. या  प्रधानमंत्री योजनेंतर्गत झोपडपट्टीवासीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती, अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती, या योजनेसाठी अर्ज करू शकतो. परंतु योजनेसाठी संबंधित लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे पती, पत्नी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावे भारतात कोठेही पक्के घर नसले पाहिजे ही प्रमुख अट घालण्यात आली आहे. यामुळेच एका राज्यातील व्यक्ती कोणत्याही शहरात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करू शकणार असल्याचे माने पाटील यांनी स्पष्ट केले .
------ 
राज्यातील या प्रमुख ५१ शहरामध्ये घरासाठी अर्ज करता येणार 
महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ५१ शहरे मंजूर करण्यात आली आहेत. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील ५१ शहरांची निवड करण्यात आली असून,  या योजनेची अंमलबजावणी या शहरालगतच्या नियोजित क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये १) बृहन्मुंबई, २) पुणे, ३) नागपूर, ४) पिंपरी-चिंचवड, ५) ठाणे, ६) नाशिक, ७) नवी मुंबई, ८) सोलापूर, ९) औरंगाबाद, १०) कल्याण-डोंबिवली, ११) कोल्हापूर, १२) सांगली, १३) अमरावती, १४) मिरा भाईंदर, १५) उल्हासनगर, १६) भिवंडी, १७) अहमदनगर, १८) अकोला, १९) जळगाव, २०) नांदेड वाघाळा, २१) धुळे, २२) मालेगाव, २३) वसई विरार, २४) लातूर, २५) परभणी, २६) चंद्रपूर, २७) इचलकरंजी, २८) जालना, २९) भुसावळ, ३०) पनवेल, ३१) सातारा, ३२) बीड, ३३) यवतमाळ, ३४) गोंदिया, ३५) बार्शी, ३६) अचलपूर, ३७) उस्मानाबाद, ३८) नंदूरबार, ३९) वर्धा, ४०) उदगीर, ४१) हिंगणघाट, ४२) अंबरनाथ, ४३) बदलापूर, ४४) बुलडाणा, ४५) गडचिरोली, ४६) वाशिम, ४७) भंडारा, ४८) हिंगोली, ४९) रत्नागिरी, ५०) अलिबाग, ५१) सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग अशी एकूण 51 शहरांची नावे मंजूर करण्यात आली .

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Anyone in the state can apply for a house under Pradhan Mantri Awas Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.