शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘लो वॉटर झोन’बाबत ‘कही खुशी, कही गम’

By admin | Updated: January 26, 2015 01:49 IST

एका बाजूला नागरिकांना नियमानुसार घरांचे बांधकाम करता येईल, यासाठी महापालिकेकडून नवीन बांधकाम नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे

हणमंत पाटील, पुणेएका बाजूला नागरिकांना नियमानुसार घरांचे बांधकाम करता येईल, यासाठी महापालिकेकडून नवीन बांधकाम नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याच वेळी प्रारूप विकास आराखड्यातील आणखी एक गोंधळ समोर आला आहे. धनकवडी परिसरातील ‘पाणी कमतरता विभागा’चे (लो वॉटर झोन) आरक्षण उठविताना केवळ सर्व्हे क्रमांक ४, ५ व ६ वगळण्यात आले. प्रशासनाच्या ‘प्रिंटिंग मिस्टेक’मुळे एकाच भागातील नागरिकांना वेगवेगळा न्याय देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. शहराच्या १९८७ चा जुन्या हद्दीचा विकास आराखडा आणि समाविष्ट २३ गावांच्या नवीन विकास आराखड्यातील डोंगर उताराच्या भागात पूर्वी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे या भागातील लोकसंख्या व बांधकामावर नियंत्रण आणण्यासाठी डोंगर उताराच्या भागात ‘लो वॉटर झोन’ म्हणून ०.३३ चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) बांधकामाला परवानगी होती. मात्र, काही वर्षांतच तळजाई मंदिरालगत लाखो लिटर पाणीपुरवठा टाकी उभारण्यात आली. त्यामुळे पूर्वीच्या टेकडी व उताराच्या परिसरात पुरेसा पाणीपुरवठा होऊ लागला. त्यामुळे या भागात लोकवस्ती वाढत गेली. मात्र, बांधकामावर नियंत्रण असल्याने राजकीय वरदहस्ताने अनधिकृत बांधकामाकडे कल वाढला. त्यामुळे धनकवडी, आंबेगाव व तळजाई परिसर अनधिकृत बांधकामासाठी कुप्रसिद्ध झाला. मात्र, त्याचे मूळ असलेल्या ‘लो वॉटर झोन’च्या समस्येकडे दुर्लक्ष झाले. दरम्यान, जुन्या हद्दीचा प्रारूप आराखडा तयार करताना आणि समाविष्ट गावांचा विकास आराखडा मंजूर करताना स्थानिक नागरिकांनी पाण्याची पुरेशी सुविधा झाल्याने ‘लो वॉटर झोन’ उठविण्याची मागणी केली. त्यानंतर दोन्ही विकास आराखडे मंजूर झाले. त्या वेळी केवळ सखल व मैदानी भागातील सर्व्हे क्रमांक ४,५ व ६ वगळता याच भागाच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व्हे क्रमांक ३, ७, ८, १० व ११ येथील डोंगर उताराचे ‘लो वॉटर’चे आरक्षण उठविण्यात आले. त्यामुळे याप्रकरणात काही तरी राजकारण झाले असून, पक्षपातीपणा करण्यात आल्याचा प्रश्न प्रभाग क्रमांक ६९ मधील ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात उपस्थित करण्यात आला होता. त्याविषयाचा पाठपुरावा करून माहिती घेतली असता, प्रारुप विकास आराखड्यातील ‘प्रिंटिंग मिस्टेक’मुळे हा गोंधळ झाल्याचे उजेडात आले आहे. त्यावर धनकवडी येथील राजीव देशपांडे व उदय कुलकर्णी यांनी हरकती नोंदविल्या आहेत.