स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 01:18 AM2018-08-25T01:18:54+5:302018-08-25T01:19:23+5:30

स्वाइन फ्लूने अजून एका नागरिकाचा बळी घेतला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूने मृत्यू पावलेल्यांची संख्या चार झाली आहे. तर शुक्रवारी अजून एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या २९ झाली आहे.

 Another victim of swine flu | स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी

स्वाइन फ्लूचा आणखी एक बळी

Next

पिंपरी : स्वाइन फ्लूने अजून एका नागरिकाचा बळी घेतला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूने मृत्यू पावलेल्यांची संख्या चार झाली आहे. तर शुक्रवारी अजून एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या २९ झाली आहे. शुक्रवारी (दि़ २४) गोखले पार्क येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. गेल्या पाच दिवसांपासून ही महिला खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. जानेवारी महिन्यापासून स्वाइन फ्लूने मृत्यू होणाऱ्यांची संख्या चारवर पोहोचली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात या महिन्यात स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू झाला आहे. वेळेत उपचार न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याची संख्याही वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच, जानेवारीपासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९ वर पोहोचली आहे. शहरात स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णांची व मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही सतत वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातील स्वाइन फ्लू विभागाचे समन्वयक डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ‘‘स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या महिलेला किडनी व ब्लड प्रेशरचा त्रास होता. तसेच, स्वाइन फ्लू आजाराने शहरातील खासगी रुग्णालयात तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.’’

Web Title:  Another victim of swine flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.