शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नरमध्ये आणखी एक बिबट्या जेरबंद

By admin | Updated: June 13, 2015 04:37 IST

जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पिंपळगाव जोगा, भोईरवाडी, वीरशेटदरा या परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात आज (दि. १२) पहाटे पाच वाजता बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

मढ : जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पिंपळगाव जोगा, भोईरवाडी, वीरशेटदरा या परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात आज (दि. १२) पहाटे पाच वाजता बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.ओतूरचे वनक्षेत्रपाल सचिन रघतवान यांनी दिलेली माहिती अशी, की पिंपळगाव जोगा परिसरातील भोईरवाडी येथे २६ मे रोजी बिबट्याने घरापासून सखुबाई नानाभाऊ हिले (वय ६०) या महिलेला हल्ला करून घरापासून फरफटत ५०० मीटर अंतरावर जंगलात नेऊन ठार केले होते. त्यानंतर वनविभागाने या परिसरात पाहणी करून पाच पिंजरे लावले होते. पथकांकडून नियमित गस्तही सुरू होती.शुक्रवार (दि.१२) सखाराम पांडुरंग भोईर यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. तेथे तैनात वनसेवक एल.एम. भांगले, सुभाष डामसे यांनी पाहिले व तत्काळ वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यानंतर वनक्षेत्रपाल एस.एस. रघतवान यांनी घटनास्थळी भेट दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक ज्यामध्ये वनपाल एस.डी. वायभसे, सी.एस. कांबळे, वनरक्षक एस.जी. मोमिन, वनसेवक भरत पारधी, नाना जाधव, पी.एस. मुरादे, जी.आर. मेमाणे, गणपत केदार हेही घटनास्थळी हजर झाले. जेरबंद बिबट्याला माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात सुरक्षित पोहोचवण्यात आले. प्रथमदर्शनी ही मादी असून, अंदाजे चार वर्षे वयाची असावी, असे वनविभागाकडून सांगण्यात आले. या मादीबरोबरच वनविभागाकडून पिंजऱ्यात जेरबंद केलेल्या बिबट्यांची संख्या सहा झाली आहे. (वार्ताहर)