पुणे: पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे. मंत्री चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवारांनीपुणेकर अजूनही तुम्हाला पुण्याचे समजत नाहीत. ते तुम्हाला कोल्हापूरचेच समजतात. अशा प्रकारे चिमटा काढला होता. त्यानंतर आता फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांची पाठराखण केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फडणवीस यांनी पुरस्कार प्रदान केल्यानंतर आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांचे नाव घेत मिश्किल विनोद केला आहे. भाषण सुरू झाल्यावर त्यांनी नितीन गडकरी यांच्या पुरस्काराचे कौतुक केले. ते म्हणाले, ज्यांनी महाराष्ट्र देशाला नवीन स्वरूप दिलं. असे लाडके नेते नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत असे चंद्रकांत दादा असं म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला. काही लोक दादागिरी करत नाहीत. पण त्यांचं व्यक्तिमत्वचं तस असतं असं म्हणत दादांचे कौतुक केले. त्यानिमित्ताने या पुरस्कार सोहळ्यात राजकीय विनोदही ऐकायला मिळाल्याची चर्चा होती.
अजितदादांनीही काढला चंद्रकांत दादांना चिमटा
कार्यक्रम सुरु झाल्यावर सूत्रसंचालन करणाऱ्या महिलेने मंचावर दोन दादा आहेत असं म्हणाले होते. एका अजित दादा आणि दुसरे रोहित दादा आहेत. त्यानंतर महिलेने चंद्रकांत दादा पण आहेत असं म्हणत सर्व दादांचा उल्लेख केला. त्यावरून अजित पवारांनी चंद्रकांत दादांना टोमणे मारले आहेत. तुम्ही अजून देखील पुणेकरांना पुण्याचे वाटत नाहीत त्यांना कोल्हापूरचेच वाटतात. असं म्हणून चिमटे काढले. कदाचित अजून देखील त्यांना ते कोल्हापूरचे आहे असं वाटत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे असं अजितदादा म्हणाले आहेत. त्याच वेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "तुम्हीच त्यांना पालकमंत्री होऊन दिल नाही ना" असा टोला अजितदादांना लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपण एकत्र येणार होतो तेव्हाच ठरलं होतं की मीच पालकमंत्री असेल. असे बोलून अजित पवारांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.