Pune Crime: अल्नेश सोमजी विरोधात आणखी एक तक्रादार पुढे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 21:14 IST2021-11-08T21:13:07+5:302021-11-08T21:14:48+5:30
पुणे : गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वार्षिक २४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अल्नेश ...

Pune Crime: अल्नेश सोमजी विरोधात आणखी एक तक्रादार पुढे
पुणे : गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वार्षिक २४ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अल्नेश अकील सोमजी याच्या पोलीस कोठडीत ३ दिवसांची वाढ केली. त्यांची पत्नी डिंपल सोमजी हिला १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गुंतवणुकदारांनी फसवणूक केल्याप्रकरणी अल्नेश सोमजी व डिंपल सोमजी हे गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले होते. पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली होती. दिल्ली विमानतळवरुन पळून जात असताना दोघांना पकडण्यात आले होते. खंडणी विरोधी पथकाने त्यांना दिल्लीहून आणून अटक केली होती. न्यायालयाने त्यांना ८ नोव्हेबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती.
त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आणखी एक तक्रारदार समोर आला असून त्यांच्या वकीलाने सोमजी यांनी फसवणूक केल्याचे सांगितले. सोमजी यांच्या फर्मची कागदपत्रे ताब्यात घ्यायची आहेत. तसेच गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली रक्कम जप्त करायची असल्याने पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली. त्यानुसार न्यायालयाने अल्नेश सोमजी यांच्या पोलीस कोठडीत ३ दिवसांची वाढ केली असून डिंपल सोमजी यांची न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.