शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आणखी एक खटला दाखल; 'ही' केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 20:16 IST

या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही.

पुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी लष्कर न्यायालयात आणखी एक खटला दाखल करण्यात आला आहे. या आत्महत्या प्रकरणाची वानवडी पोलिसांनी चौकशी करावी आणि त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीने न्यायालयाकडे धाव घेतली असून, लष्कर न्यायालयात खटला दाखल केला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीने याबाबत न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्यावर झालेल्या युक्तिवादानंतर हा खटला दाखल झाला आहे. यापूर्वी लीगल जस्टिस सोसायटीतर्फे अ‍ॅड. भक्ती पांढरे यांनी देखील फिर्याद दिली होती. त्यानुसार त्यांचाही खटला लष्कर न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही अर्जांवर दि.5 मार्च रोजी निकाल होणार आहे. या दोन्हीही खटल्यात कोणतीही व्यक्ती किंवा संशयिताचे नाव देण्यात आलेले नाही.

या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. या प्रकरणात कोणाचा हात नाही, असे पोलिसही स्पष्ट करत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हावा. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत,यासाठी आम्ही हा खटला दाखल केला असल्याची माहिती भाजपा वकील आघाडीच्या अध्यक्ष अ‍ॅड. ईशानी जोशी यांनी दिली.-------------------------------पूजा आत्महत्या प्रकरणामध्ये वानवडी पोलिसांनी तपास सुरू करावा आणि तक्रार दाखल करावी यासाठी 156 (3) या कलमाखाली लष्कर कोर्टात अर्ज दाखल केला. या घटनेला 22 दिवस उलटले तरी पोलिसांनी कोणताच तपास केलेला नाही. यासाठी काही दिवसांपूर्वी भाजप महाराष्ट्र प्रदेशाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी वानवडी पोलिस अधिका-यांची भेट घेतली होती. तेव्हा पोलिसांनी आजवर तक्रार दाखल करायला कुणीच आलेले नसल्याचे सांगितले. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकतर््यांनी तक्रार दाखल करूनही सात दिवस झाले. पोलिसांना कुणीही तक्रार दाखल करण्याची वाट पाहाण्याची गरज नाही. पोलीस सुमोटो देखील दाखल करू शकतात. मात्र ते कुणाच्या आदेशाची वाट पाहात आहेत ते कळत नाही. मंगळवारी (दि.2) आमच्या अर्जावर युक्तीवाद झाला. न्यायालयाने आमचे म्हणणे ऐकून घेतले. न्यायालयात खटला दाखल झाला आहे. याबाबतची पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार आहे.अ‍ॅड. ईशानी जोशी, अध्यक्षा, भाजपा वकील आघाडी-------------------------------------------------------------------समाजाची बदनामी थांबून न्याय द्या... पुण्यातील वकिलाची मुख्यमंत्र्याकडे मागणी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात पूजाच्या चारित्र्याचे हनन होत असून काही घटकांकडून बंजारा समाजाची बदनामी करण्यात येत आहे. त्यांविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करत समस्त समाजाला न्याय देण्याची मागणी अ‍ॅड. रमेश राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, याप्रकरणात वेळोवेळी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावेत अशी तक्रार वानवडी पोलिस ठाण्यात दिली असल्याचेही राठोड यांनी सांगितले.------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयPooja Chavanपूजा चव्हाण