शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भिमानदीकाठी पुन्हा एक मृतदेह आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 18:22 IST

नदीपात्रात सात जणांचे मृतदेह आठवडाभरात मिळून आले होते

रांजणगाव सांडस : पुणे जिल्ह्यात दौंड व शिरूर तालुक्यातील भिमानदीकाठी मृतदेह सापडण्याचे सत्र सुरूच असून आज सकाळच्या सुमारास शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे भीमा नदी काठी सकाळच्या सुमारास एका व्यक्तीचा अर्ध नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे . लक्ष्मण बापुराव सूर्यवंशी (रा. पारगाव ता. दौड़ जि. पुणे )असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवडाभरात भीमा नदीकाठी हा आठवा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याच नदीपात्रात सात जणांचे मृतदेह आठवडाभरात मिळून आले होते. पुन्हा एकदा याच ठिकाणी मृतदेह मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत रामचंद्र बापूराव सूर्यवंशी (वय 40 रा. पारगाव ता. दौंड जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी, रामचंद्र सूर्यवंशी यांना ज्ञानदेव ताकवणे यांचा फोन आला कि पारगाव-चे पुलावर ये तुझा भाऊ लक्ष्मण सूर्यवंशी नदीच्या कडेला पडलेला आहे. तेव्हा रामचंद्र सूर्यवंशी यांनी लगेच नागरगाव ता. शिरूर जि. पुणे गावचे हद्दी पारगाव पुलाजवळ नदीचे कडेला जाऊन पाहिले असता त्यांचा भाऊ लक्ष्मण सूर्यवंशी यांचा मृतदेह पडलेला त्यांना दिसला. त्यावेळी रामचंद्र सूर्यवंशी यांनी त्याचे जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या नाका तोंडातून फेस येत होता व त्याचे शरीर थंड झाले होते. भाऊ लक्ष्मण सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्याने सूर्यवंशी यांनी याबाबत शिरूर पोलिसांना कळवले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र साबळे हे करत आहे.

यावेळी घटनास्थळी मांडवगण फराटा पोलीस चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, सहाय्यक फौजदार  राजेंद्र साबळे, संपत खबाले,योगेश गुंड,  आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.यावेळी भाजप तालुका अध्यक्ष ज्ञानदेव ताकवणे,जालिंदर भोगाडे, डॉ. राहुल ताकवणे, खंडू ताकवणे, रवींद्र बोत्रे, रामचंद्र बोत्रे,नागेश चंद्राकर, आप्पा कदम, अंकुश शेलार, बापू बोत्रे आदी ग्रामस्थांनी नदीकाठी असलेला मृतदेह बाहेर काढण्याकामी  पोलिसांना विशेष सहकार्य केले.

टॅग्स :PuneपुणेriverनदीPoliceपोलिसDeathमृत्यू