शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांच्या आत्महत्या प्रकरणी आणखी एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 21:49 IST

कला दिग्दर्शक राजेश मारुती साप्ते यांनी ताथवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

पिंपरी : कला दिग्दर्शक राजेश मारुती साप्ते (वय ५१) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आणखी एकाला अटक केली आहे. साप्ते यांनी ताथवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी यापूर्वी तीन जणांना अटक केली आहे.

राकेश सत्यनारायण मौर्य (वय ४७, रा. कांदिवली ईस्ट, मुंबई), असे गुरुवारी (दि. १५) अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी साप्ते यांचा बिझनेस पार्टनर चंदन रामकृष्ण ठाकरे (वय ३६, रा. एकतानगर, कांदिवली वेस्ट, मुंबई),  नरेश विश्वकर्मा आणि दीपक उत्तम खरात (वय ३७, रा. गोरेगाव पूर्व, मुंबई) यांना अटक केली आहे. त्यांच्यास गंगेश्वर श्रीवास्तव (संजूभाई), अशोक दुबे (सर्व रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोनाली राजेश साप्ते (वय ४५, रा. ताथवडे, सध्या रा. कांदिवली वेस्ट, मुंबई) यांनी याप्रकरणी ३ जुलै २०२१ रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनाली साप्ते यांचे पती राजेश साप्ते यांना जीवे मारण्याची तसेच लेबर लोकांना कामावर येऊ देणार नाही आणि व्यवसायिक नुकसान करण्याची आरोपींनी धमकी दिली. वारंवार धमकी देऊन जबरदस्तीने १० लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक लाख रुपयांची मागणी केली. आरोपींनी राजेश साप्ते यांना त्यापोटी अडीच लाख रुपये जबरदस्तीने देण्यास भाग पाडले. तसेच आरोपी चंदन ठाकरे यानेही वेळोवेळी विश्वासघात व फसवणूक करून त्यांचे आर्थिक नुकसान केले. आरोपींच्या जाचाला कंटाळल्याने दिग्दर्शक साप्ते यांनी ताथवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचा हा प्रकार ३ जुलै २०२१ रोजी उघडकीस आला.   -----------अटकपूर्व जामिनासाठी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला

पोलिसांनी चंदन ठाकरे तसेच आरोपी नरेश विश्वकर्मा याला यापूर्वीच अटक केली. तर आरोपी राकेश मौर्य हा पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला गुरुवारी पिंपरी येथून पुणे-मुंबई महामार्गावरील मोरवाडी चौक परिसरातून पकडले. या प्रकरणात आरोपी दीपक खरात याचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी खरात याला बुधवारी (दि. १४) अटक केली. त्याला सोमवारपर्यंत (दि. १९) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक