शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज-कोंढवा रस्त्यावर पुन्हा अपघात; दुचाकी आणि कंटेनरच्या धडकेत एक जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 13:31 IST

या परिसरात पुन्हा एक अपघात झाला असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला....

कोंढवा (पुणे) :कात्रजकोंढवा रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला असून दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात पुन्हा एक अपघात झाला असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. अनिल नीलेश पतलावकर-राठोड असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे तर गणेश जाधव व सुनील राठोड अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, सोमवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास अनिल नीलेश पतलावकर (राठोड ), गणेश जाधव, सुनील राठोड, हे तिघे एकाच मोटारसायकलवर (एमएच ४६ एआर ४२२५) कात्रज-कोंढवा रस्त्यावरील टिळेकरनगर येथून खडीमशीन चौकाकडे जात होते. असताना खडीमशीन पोलिस चौकीच्या समोरून येणाऱ्या कंटेनर (एमएच १२ जेबी ६८८९) ला त्यांची धडक बसली. त्यामध्ये मोटारसायकल कंटेनरच्या चाकाखाली जाऊन अडकली व अनिल नीलेश पतलावकर राठोड याचा जागीच मृत्यू झाला तर गणेश जाधव व सुनील राठोड हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीkatrajकात्रजKondhvaकोंढवा