शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! १२ वीच्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी; संतप्त पालकांनी काढली क्लार्कची धिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 20:46 IST

पुण्यातील संतापजनक प्रकार; १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडे गुण वाढवून देण्याच्या आमिषाने शिक्षकाने केली शरीरसुखाची मागणी..

पुणे : पुण्यातील एका महाविद्यालयातील १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला गुण वाढवून देण्याच्या आमिषाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संतापलेल्या पालकांनी या क्लार्कला काळे फासत मारहाण केली. त्यानंतर त्याची महाविद्यालयातून विश्रामबाग पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. विश्रामबाग पोलिसांनी या क्लार्कला अटक केली आहे.अभिजित पवार असे या क्लार्कचे नाव आहे. तो या महाविद्यालयात प्रशासकीय काम पाहतो.

याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांनी सांगितले की, बिबवेवाडीत राहणारी एक १८ वर्षाची विद्यार्थीनी मध्य वस्तीतील एका नामांकित महाविदयालयात १२ वीमध्ये शिकत आहे. तिने मार्कलिस्टबाबत मंगळवारी पवार याच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्याने पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी अंतर्गत गुण वाढवून देतो, असे आमिष दाखवून कोठे प्रवेश घ्यायचा आहे, अशी विचारणा केली. तेव्हा या विद्यार्थिनीने आपल्याला पोलीस व्हायचे आहे, असे सांगितले. त्यावर पवार याने तिच्याकडे वाईट नजरेने पाहून लज्जास्पद बोलून शरीरसुखाची मागणी केली. या प्रकाराने ही विद्यार्थिनी घाबरुन गेली. महाविद्यालयातून ती घरी गेली. परंतु, पवार याच्या बोलण्यामुळे तिला रात्रभर झोप आली नाही. बुधवारी सकाळी तिने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. तिने आपल्या पतीला हे सांगितले. त्यामुळे तिचे पालक संतापले. ते सर्व दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महाविदयालयात गेले. त्यांनी पवार याच्याकडे या प्रकाराचा जाब विचारला. त्याला काळे फासले. त्याला बेदम मारहाण केले. त्यानंतर त्याला मारहाण करुन विश्रामबाग पोलीस ठाण्यात घेऊन आले. या प्रकाराने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकाराचा अनेकांनी निषेध केला आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयPoliceपोलिसTeacherशिक्षकsexual harassmentलैंगिक छळ