अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहेरेच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 10:47 IST2018-05-14T08:57:46+5:302018-05-14T10:47:53+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पहाटेच्या सुमारास अपघात

aniket vishwasrao and prarthana beheres car met with an accident near Lonavala | अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहेरेच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात

अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहेरेच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात

मुंबई: अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात झाला आहे. मस्का चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात असताना हा अपघात झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अनिकेत आणि प्रार्थना सुखरुप आहेत. या अपघातात प्रार्थनाच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला चुकवताना हा अपघात झाल्याची माहिती अनिकेस विश्वासरावनं एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. अपघातात कोणीलाही गंभीर दुखापत न झाल्याचंही अनिकेतनं सांगितलं आहे. 

मस्का या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनिकेत विश्वासराव आणि प्रार्थना बेहरे कोल्हापूरला जात होते. त्यासाठी ते मुंबई-पुणे एक्स्प्रेसहून निघाले होते. पहाटेच्या सुमारास त्यांची गाडी लोणावळ्याजवळ पोहोचली. यावेळी एका बंद पडलेल्या टेम्पोला चुकवताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. यावेळी अनिकेत पुढे बसला होता. त्यानं सीट बेल्ट लावला असल्यानं त्याला फारशी दुखापत झाली नाही. मात्र मागे बसलेल्या प्रार्थनाचा उजव्या हाताला दुखापत झाली. तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे. तर तिची सहाय्यक स्वातीच्या डोक्याला इजा झाली आहे. या दोघींवर लोणावळ्यामधील यश रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे. 

Web Title: aniket vishwasrao and prarthana beheres car met with an accident near Lonavala

टॅग्स :Accidentअपघात