चिडलेल्या जावयाने सासूचे पाडले दात, तोंडावर गरम पाणीही फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 12:01 IST2023-05-24T12:00:46+5:302023-05-24T12:01:36+5:30

पाणी तोंडावर टाकल्याने सासूच्या चेहऱ्याला भाजले आहे...

angry son-in-law knocked out his mother-in-law's teeth and threw hot water on her mouth | चिडलेल्या जावयाने सासूचे पाडले दात, तोंडावर गरम पाणीही फेकले

चिडलेल्या जावयाने सासूचे पाडले दात, तोंडावर गरम पाणीही फेकले

पुणे : घरजावयाबरोबर झालेल्या वादात सासूने घरात राहू नको, असे म्हटले आणि चिडलेल्या जावयाने सासूच्या तोंडावर गरम पाणी फेकले. तसेच केस धरून जमिनीवर डोके आपटल्याने त्यांचे दोन दात पडले. याप्रकरणी खडकी पोलिसांनी महेंद्र सिद्धनाथ तोरणे (वय २५, रा. आर्मी क्वार्टर, सर्वत्र विहार कॉलनी, मुळा रोड) याला अटक केली आहे. सासूवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी ह्या खडकी येथील ॲम्युनेशन फॅक्टरीत नोकरीस आहेत. आरोपी महेंद्र हा त्यांचा जावई असून, त्यांची मुलगी आणि त्या असे तिघे आर्मी क्वार्टर सर्वत्र विहार, मुळा रोड समोर राहतात. सोमवारी सकाळी जावई आणि सासू यांच्यात वाद झाला. त्यावेळी त्यांनी जावयाला घरातून दुसरीकडे राहायला जाण्यास सांगितले. पाणी तोंडावर टाकल्याने सासूच्या चेहऱ्याला भाजले आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस उपनिरीक्षक बेंदगुडे तपास करीत आहेत.

Web Title: angry son-in-law knocked out his mother-in-law's teeth and threw hot water on her mouth