बहिणीची छेड काढल्याचा राग मनात धरला; १६ वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड घालत काटा काढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 16:13 IST2021-09-07T16:13:11+5:302021-09-07T16:13:57+5:30
या प्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकास अटक

बहिणीची छेड काढल्याचा राग मनात धरला; १६ वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड घालत काटा काढला
चाकण : बहिणीची छेड काढल्याच्या रागात मनात धरून एका सोळा वर्षीय मुलाचे अपहरण करून लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करीत लोखंडी रॉड आणि दगड डोक्यात घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकास अटक करण्यात आली आहे.
रोहित प्रभू साहनी ( वय.१६ वर्षे,रा.झित्राईमळा, चाकण ) असे हत्या करण्यात मुलाचे नाव असून, आरफत वाजीब सिकिलकर,करण पाबळे,हुजेब असिफ काकर,निहाल इनामदार, मन्सूर इनामदार,सोहेल इनामदार ( सर्व रा.चाकण ),युसुफ अर्षद काकर ( वय.२० वर्षे,रा.चाकण ) अशी आरोपींची नावे आहेत.या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रोहित प्रभू साहनी याने आरोपी अराफत वाजीब सिकिलकर याच्या बहिणीची छेद काढली होती.याचा राग मनात धरून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने हॉटेल सॅनकर कट्टा येथे बसलेल्या रोहितकडे ( दि.६ सप्टेंबर ) ला दुपारच्या सुमारास अराफत शिकीलकर याने त्याच्या मित्र मन्सूर इनामदारला रोहितकडे पाठवले. मन्सूरने तिथून रोहितचे दुचाकीवरून अपहरण करण्यात आले आहे. चाकण मार्केट यार्डच्या समोर मोकळ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानात त्याला आणले. त्या मोकळ्या मैदानात अराफत आणि त्याचे आणखी ५ मित्र उपस्थितीत होते. या सर्वांनी मिळून,रोहितला लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली.अराफतने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने रोहितच्या डोक्यात जोरात प्रहार केला आहे. मित्र युसूफ काकरने डोक्यात दगड घातला आहे. यात रोहित जागीच गतप्राण झाला.याप्रकरणी चाकण पोलिसांनी मन्सूर काकर यास अटक करण्यात आली आहे.पण अराफत आणि त्याच्या आणखी पाच जण फरारी झाले असून त्यांचा शोध सुरु आहे.चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस पुढील तपास पोलीस करत आहेत.
----------------------------