घटस्फोट देत नसल्याचा राग, पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न; कोथरूडमधील घटना
By नम्रता फडणीस | Updated: June 25, 2024 15:55 IST2024-06-25T15:54:56+5:302024-06-25T15:55:18+5:30
पुणे : पतीला पत्नीपासून घटस्फोट हवा आहे. मात्र ती घटस्फोट देत नव्हती. यादरम्यान पत्नीने पतीकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. मात्र ...

घटस्फोट देत नसल्याचा राग, पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न; कोथरूडमधील घटना
पुणे : पतीला पत्नीपासून घटस्फोट हवा आहे. मात्र ती घटस्फोट देत नव्हती. यादरम्यान पत्नीने पतीकडे घरखर्चासाठी पैसे मागितले. मात्र घटस्फोट देत नसल्याचा राग अनावर झाल्याने ' खूप झालं आता तुझं नाटक, संपवूनच टाकतो तुला' असे म्हणत पत्नीला मारहाण करीत जीवे ठार् मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसारी कॉलनी कोथरूड येथे राहत्या घरी दि. १८ जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी ३७ वर्षीय पत्नीने पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती पत्नी दोघांमध्ये कौटुंबिक वाद आहेत. पती पत्नीकडे सातत्याने घटस्फोटासाठी मागणी करीत आहे. मात्र पत्नी घटस्फोट देत नव्हती. दरम्यान, पत्नीने पतीकडे घरखर्चासाठी पॆसे मागितले. मात्र घटस्फोट देत नसल्याच्या रागातून तिला ढकलून दिले. तिचा गळा दोन्ही हाताने दाबून तिला लाथाबुक्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. तिला जीवे ठार् मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पॉलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.