Pune: आंदेकर टोळीतील आरोपीला सशर्त जामीन मंजूर; डोक्यास रिव्हॉल्वर लावून अपहरण केल्याचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 17:39 IST2023-07-11T17:37:31+5:302023-07-11T17:39:29+5:30

पुणे : शेजाऱ्याच्या डोक्यास रिव्हॉल्वर लावून अपहरण केल्याच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आंदेकर टोळीतील आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप ...

Andekar gang accused granted conditional bail; The crime of kidnapping with a revolver to the head | Pune: आंदेकर टोळीतील आरोपीला सशर्त जामीन मंजूर; डोक्यास रिव्हॉल्वर लावून अपहरण केल्याचा गुन्हा

Pune: आंदेकर टोळीतील आरोपीला सशर्त जामीन मंजूर; डोक्यास रिव्हॉल्वर लावून अपहरण केल्याचा गुन्हा

पुणे : शेजाऱ्याच्या डोक्यास रिव्हॉल्वर लावून अपहरण केल्याच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आंदेकर टोळीतील आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे.

भावेश रमेश सवानी असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणात जखमी झाल्याने एकाला रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा रुग्णालयाचा खर्च मागितला असता तो न दिल्याने शेजाऱ्याच्या डोक्यास रिव्हॉल्वर लावून अपहरण करण्यात आले होते. प्रवीण सुनील जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांना अटक करण्यात आली. सवानी याने ॲड. जयपाल पाटील यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

या गुन्ह्यामध्ये भावेश सवानी याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसून केवळ आरोपीचा मित्र असल्याने अटक करण्यात आलेली होती. आरोपीकडून कोणतीही रिकव्हरी नाही, आरोपीवर यापूर्वी कोणताही गुन्हा नाही, आरोपीचा सदर गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही, असा युक्तिवाद ॲड. पाटील यांनी केला. त्यांचा युक्तिवाद मान्य करीत योग्य त्या अटींवर आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला. अण्णासाहेब दराडे यांनी सहकार्य केले.

Web Title: Andekar gang accused granted conditional bail; The crime of kidnapping with a revolver to the head