...अन् उघडला ऐतिहासिक शनिवार वाड्याचा मुख्य दिल्ली दरवाजा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 03:16 PM2023-01-22T15:16:39+5:302023-01-22T15:18:02+5:30

शनिवार वाड्याची वास्तू म्हणजे २५० मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारा जिवंत शाहीर

And the main Delhi gate of the historic Shaniwar Wada was opened | ...अन् उघडला ऐतिहासिक शनिवार वाड्याचा मुख्य दिल्ली दरवाजा

...अन् उघडला ऐतिहासिक शनिवार वाड्याचा मुख्य दिल्ली दरवाजा

googlenewsNext

पुणे : थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार वाड्याचा २९१ वा वर्धापन दिन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सनई चौघड्यांचे सुर आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे यांना अभिवादन करीत शनिवारवाड्याचा मुख्य दिल्ली दरवाजा देखील यावेळी उघडण्यात आला.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), इतिहासतज्ज्ञ मोहन शेटे, सूर्यकांत पाठक, सचिव कुंदन कुमार साठे, श्रीकांत नगरकर, विद्याधर नारगोलकर, चिंतामणी क्षीरसागर, विश्वनाथ भालेराव, उमेश देशमुख आणि पेशवे कुटुंबीय उपस्थित होते.

मोहन शेटे म्हणाले, शनिवार वाड्याची वास्तू म्हणजे केवळ दगड धोंडे नाहीत. २५० मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारा जिवंत शाहीर आहे. कितीतरी विजयाच्या वार्ता या शनिवार वाड्यावर आल्या. बाजीराव पेशवे यांनी पुण्याला राजधानी करण्याचा निर्णय घेतला आणि पुण्यात वैभव संपन्न आणि देखणा शनिवार वाडा बांधला.  त्यावेळी केवळ पुण्यात किंवा भारतातच नाही तर आशियातील उत्तम दर्जाचा वाडा होता. परंतु या वाड्याचा उपभोग घेण्यासाठी बाजीराव पेशवे येथे थांबले नाहीत. ते सतत रणांगणावर लढले, ही देखील अभिमानाची गोष्ट आहे. 

Web Title: And the main Delhi gate of the historic Shaniwar Wada was opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.