संघर्षातून घडतो इतिहास : बनसोडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 00:21 IST2019-02-06T00:21:28+5:302019-02-06T00:21:41+5:30
एव्हरेस्ट शिखर सर करून माझे ध्येय पूर्ण केले. पण त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला व त्यामुळे हा इतिहास घडला. ध्येयवेडी माणसेच इतिहास घडवितात, असे प्रतिपादन एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी केले.

संघर्षातून घडतो इतिहास : बनसोडे
ओतूर : एव्हरेस्ट शिखर सर करून माझे ध्येय पूर्ण केले. पण त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला व त्यामुळे हा इतिहास घडला. ध्येयवेडी माणसेच इतिहास घडवितात, असे प्रतिपादन एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी केले.
ओतूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे, खेलो इंडिया २०१९ ची सुवर्णपदकविजेती वडगाव शेरी (पुणे) येथील इयत्ता १० वीतील लोणकर विद्यालय पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या भागशाळेची विद्यार्थिनी अवंतिका संतोष नराळे, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ओतूरचे मानद सचिव वैभव तांबे, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, प्राचार्य डॉ. टी. एन. साळवे, डॉ. एस. बी. वाळके, उपप्राचार्य डॉ. जी. एम. डुंबरे, उपप्राचार्य डॉ. एस. एफ. ढाकणे, प्रा. संजय बागडे, ज्येष्ठ प्रा. नॅकप्रमुख डॉ. व्ही. एम. शिंदे, एनसीसी प्रमुख डॉ. नीलेश हांडे, डॉ. एम एम बागुल ,डॉ. एस एस लंगडे ,जिमखाना विभागाचे डॉ. उमेश पनेरू ,प्रा. बाळासाहेब हाडवळे , डॉ. के.डी सोनावणे, प्रा. व्ही. बी. दुराफे, आर एन गिरमकर, यू.डी. कारभळ, डॉ. डी एम. टिळेकर, डॉ, शितल कल्हापुरे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, ईशस्तवन, स्वागतगीत व मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, बुके व स्मृतिचिन्ह देऊन प्राचार्य साळवे व आदी मान्यवर प्राध्यापकांच्या हस्ते गौरविण्यात आले.