शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

कशी झाली भारताची निर्मिती ते पाहण्याची संधी..!

By श्रीकिशन काळे | Updated: January 11, 2025 19:27 IST

निर्मिती भारतभूमीची हे प्रदर्शन रविवार १२ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत सर्वांना पाहता येईल. 

पुणे : आपली पृथ्वी सात खंडे आणि पाच महासागरांनी व्यापली आहे. आपली भारतभूमी देखील लक्षावधी वर्षांपूर्वी वेगळी होती, वेगळ्या स्थानी होती. तिच्या निर्मितीची कहाणी मनोरंजक व विस्मयकारक असून, त्याची माहिती बालगंधर्व कलादालनात पहायला मिळत आहे.  निर्मिती भारतभूमीची हे प्रदर्शन रविवार १२ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत सर्वांना पाहता येईल. जीविधा संस्थेतर्फे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून समुद्रावर तरंगत भारतीय द्वीपकल्प अनेक दशलक्ष वर्षांचा प्रवास करत उत्तर गोलार्धात आला. प्रवासात पश्चिमघाट, दख्खनचे पठार यांची निर्मिती झाली. हा भूखंड उत्तर गोलार्धातल्या युरेशियन भूखंडाला धडकला आणि दोन भूखंडांमधला टेथिस समुद्र तळासहित वर उचलला गेला तेव्हा हिमालय पर्वतरांगांची निर्मिती झाली. गंगेसारख्या नद्या वाहत्या झाल्या त्यामुळे उत्तरप्रदेशातील मैदानी प्रदेशांची निर्मिती झाली. हा कालपट 350 दशलक्ष वर्षे एवढा विस्तीर्ण आहे. या घटनांतून आजच्या भारताचे भौगोलिक चित्र निर्माण झाले आणि आश्चर्यकारक जैवविविधता निर्माण झाली. याची माहिती सचित्र प्रदर्शनात पाहता येत आहे. जगातील महाजीविधता असणाऱ्या देशांची यादी बनवली आहे. त्यात फक्त 21 देशांचा समावेश आहे व भारताचा क्रमांक 8 वा आहे. या भूवैज्ञानिक घटनांमुळे भारतात अनेक परिसंस्था तयार झाल्या. तसेच उंची, तपमान, पर्जन्यमान यात प्रचंड विविधता निर्माण झाली. यासर्वाचा परिणाम भारतात मोठ्या प्रमाणात जैवविविधता निर्माण झाली.  भारत देशाच्या निर्मितीची ही इंटरेस्टिंग कहाणी जीविधा संस्थेतर्फे बालगंधर्व कलादालनात 9 ते 12 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित केलेल्या प्रदर्शनात पोस्टर स्वरूपात पहायला मिळत आहे. याशिवाय महत्वाच्या भूवैज्ञानिक घटनांचे माॅडेल्स व अनेक नकाशे ठेवले आहेत.  प्रदर्शनात प्रकाशमान दगड ! प्रदर्शनामध्ये प्रकाशमान दगडही पहायला मिळत आहे. "माय मिनरल्स अर्थ" ने भारतात आढळणारे खडक, खनिजे  व फाॅसिल्स यांचा संग्रह प्रदर्शनात ठेवला आहे. डाॅ. हार्दिक सकलेचा यांनी जगभरात फिरून हे खडक, खनिजे संकलित केली आहेत. ते पाहणे अतिशय आनंददायी आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEarthपृथ्वीExhibitionप्रदर्शन