तळेगावात देवदर्शन करून घरी जाणाऱ्या महिलेचा अपघातात जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 14:06 IST2022-10-20T14:01:44+5:302022-10-20T14:06:14+5:30
हा विचित्र अपघात बुधवारी सकाळी ७.४५ च्या सुमारास येथील मारुती मंदिर चौकाजवळ झाला...

तळेगावात देवदर्शन करून घरी जाणाऱ्या महिलेचा अपघातात जागीच मृत्यू
तळेगाव दाभाडे (पुणे) : देवदर्शन करून घरी परतणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेला शालेय बसने धडक दिली. बसखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. हा विचित्र अपघात बुधवारी (दि.१९) सकाळी ७.४५ च्या सुमारास येथील मारुती मंदिर चौकाजवळ झाला. सुलोचना बळवंत देसाई (वय ७९,रा. पंचवटी कॉलनी,तळेगाव दाभाडे) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
या संदर्भात मृताचा पुतण्या सुनील शामराव देसाई (वय ५६, रा. डोळसनाथ कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुलोचना देसाई या सकाळी कडोलकर कॉलनी जवळील परमार्थ निकेतन मंदिर येथून भजन आटोपून घरी जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर बस चालक राजेंद्र शिवाजी शेंडगे यांनी वाहनासह पलायन केले. नंतर पोलिसांनी त्याला वाहनासह ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.