शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कचरा समस्येवर ‘मोबाईल कचरा प्रकल्पा’ची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:27 IST

पुणे : शहरात रोज जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी प्रक्रिया न होता शिल्लक राहिलेल्या कचऱ्यावर आता मोबाईल कचरा प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया ...

पुणे : शहरात रोज जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी प्रक्रिया न होता शिल्लक राहिलेल्या कचऱ्यावर आता मोबाईल कचरा प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया केली जाणार आहे. रामटेकडी, हडपसर, कात्रजसह चार कचरा रॅम्पवर हे प्रकल्प उभारले जाणार असून या प्रकल्पाची क्षमता १०० ते २०० मेट्रिक टनांची ची असणार आहे. रामटेकडीत साठवून राहिलेल्या कचऱ्याचे निर्मूलन करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी दिली.

शहरात दिवसाला साधारणपणे २१०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. स्वच्छ सेवा संस्थेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांमार्फत हा कचरा गोळा केला जातो. ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो. कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. शहरातील काही कचरा प्रकल्प कमी क्षमतेने सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा साठून राहिलेला आहे. आजमितीस मोठ्या प्रमाणावर कचरा प्रक्रिया न होता शिल्लक राहत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सध्या मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु नसल्याने तसेच काही प्रकल्प बंद असल्याने शहरात कचरा समस्या उद्भवली आहे. नुकताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया केली जात नसल्यामुळे ८० लाख रुपयांचा दंड केला आहे. महापालिकेने अद्याप हा दंड भरलेला नसून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीला उत्तर देण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. आम्ही शहरातून उचललेला कचरा अन्यत्र टाकत नसून कचरा डेपो वरच एकत्र करून ठेवला असला असल्याचे तसेच या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याचे धिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेला दंड मान्य नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, प्रक्रिया न होता पडून राहिलेला कचरा आता या मोबाईल कचरा प्रकल्पांच्या माध्यमातून निर्मूलन करण्यात येणार आहे.

मोबाईल कचरा प्रकल्प म्हणजे ?

रामटेकडी येथील कचरा प्रकल्पावर साठवून ठेवण्यात आलेल्या कचर्‍याचे निर्मूलन मोबाईल कचरा प्रकल्पांच्या मार्फत केले जाणार आहे. त्यासाठी छोटे-छोटे प्लांट उभारले जाणार असून या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. याला मोबाईल कचरा प्रकल्प म्हटले जाते. कचरा पुनर्प्रक्रियेसाठी पाठविला जाणार असून कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या लीचडच्या माध्यमातून लँडफिलिंगचेही काम केले जाणार आहे.