शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमोल काळे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी : कोठडीत मारहाण झाल्याची केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 22:00 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अमोल काळे याची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

ठळक मुद्देकाळेला बंगळुरू पोलिसांच्या हवाली करणारसीबीआय कोठडीत असताना कोल्हापूर एसआयटीकडून मारहाण झाल्याची तक्रार

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अमोल काळे याची न्यायालयानेन्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान काळे याने सीबीआय कोठडीत असताना कोल्हापूर एसआयटीकडून मारहाण झाल्याची तक्रार शुक्रवारी न्यायालयात केली.     पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजय ढाकणे यांनी काळे याला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. काळेला सीबीआयच्या पोलीस कोठडीत असताना कोल्हापूर एसआयटीने एसआयटीने मारहाण केली. तसेच सीबीआयच्या कोठडीत असताना इतर यंत्रणांनी त्याच्याकडे तपास केला. सीबीआयकडून या तपासासाठी परवानगी आली होती, असे बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. धर्मराज चंडेल यांनी न्यायालयाला सांगितले.       दरम्यान न्यायालयाने काळे याकडे पोलिसांबाबत काही तक्रार आहे का, अशी विचारणा केली. आपल्याला पायावर आणि पाठीवर पोलिसांनी मारले असल्याचे त्याने सांगितले. मात्र शुक्रवारी दिवसभरात कोणताही त्रास देण्यात आला नाही, असेही त्याने स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने काळेला न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणात अटक असलेला आरोपी राजेश बंगेराला सीबीआय कोठडीत कोल्हापूर एसआयटीकडून मारहाण झाल्याची तक्रार यापूर्वी न्यायालयात केली होती. याप्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे, राजेश बंगेरा, अमित दिगवेकरला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर शरद कालसकरच्या पोलीस कोठडी १५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.        पत्रकार गौरी लंकेश हत्येतील प्रमुख आरोपी काळेचा सीबीआयच्या पथकाने बेंगळुरू येथील तुरुंगातून ताबा घेतला होता. तो डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येतही मास्टरमाईंड  असावा, असा सीबीआयच्या अधिका-यांना संशय आहे.  डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर संशयित मारेकरी शरद कळसकर आणि अंदुरे यांनी ज्या दुचाकीवरून पळ काढला तिची व्यवस्था काळेने केली होती, अशी माहिती उघड झाली होते. त्यामुळे त्याला सीबीआयने ताब्यात घेतले आहे. काळेला ६ सप्टेंबरला दुपारी पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले आहे होते. त्यावेळी त्याला १४ सप्टेंबरपर्यत कोठडी देण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी मंजून झाल्याने काळे याला लंकेश हत्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभागKarnatakकर्नाटकCourtन्यायालय