शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

Atul benke: अमोल कोल्हे आणि माझी जोडी तुटणार नाही; अतुल बेनकेंचे भावनिक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 17:17 IST

खासदारकीला जशी तुम्ही डॉ. अमोल कोल्हे यांना पसंती दिली तशी आमदारकीसाठी मला पसंती द्या

उदापूर (जुन्नर) : गेल्या पाच वर्षांमध्ये जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. विकास करत असताना कोण कुठल्या पक्षाचा, कोण कुठल्या जातीचा याचा विचार कधीही केला नाही आणि इथून पुढच्या काळातही करणार नाही माझ्यावर कोणी कितीही टीका केली तरीही मी कोणावरही टीका करणार नाही. मी पक्ष बदलला नाही खासदारकीला जशी तुम्ही डॉ. अमोल कोल्हे यांना पसंती दिली तशी आमदारकीसाठी मला पसंती द्या असे भावनिक आवाहन करत खा. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांची जोडी तुटणार नाही. ती कायम बरोबर राहणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे अतुल बेनके यांनी केले.

बेनके म्हणाले, चिल्हेवाडी पाइपलाइन योजना, बिबट सफारी, वडज उपसा सिंचन, क्रीडा संकुल, पर्यटन विकास, शिव स्मारक, रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना, वळण बंधारे, पाझर तलाव यासारख्या विविध कामांच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षात प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. महायुती सरकारने शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज बिले माफ केली आहेत तसेच महिलांसाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना दिवसा लाइट देण्याची घोषणा, जुन्नर तालुका बिबट आपत्तीग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे तसेच बिबट हल्ल्यांच्या संदर्भात विविध उपाययोजना करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाच वर्षांतील कामे मतदारांपर्यंत पोहोचवा

प्रत्येक गावात मंजूर केलेली कामे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आलेला निधी आणि तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असे भविष्यातील दीर्घकालीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे नियोजन, पाणी व्यवस्थापन यांसह पाच वर्षात लोकहितार्थ राबविण्यात आलेले अनेक सामाजिक उपक्रम, शासकीय योजना या गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचवा असे आवाहन बेनके यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४junnar-acजुन्नरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार