Amit Shah : थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:01 IST2025-07-04T13:59:39+5:302025-07-04T14:01:06+5:30
- पुण्याच्या धर्तीवरून मी छञपती शिवाजी महाराजांनी नमन करतो. 17 व्या शतकात इथूनच पेशव्यांनी मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडे लावले.

Amit Shah : थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण
पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाहपुणे दौऱ्यावर आले असून, गुरुवारी रात्री त्यांचे शहरात आगमन झाले. आज सकाळी ११:३५ वाजता एनडीएमधील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह आदी नेते उपस्थित आहेत.
यावेळी कार्यक्रमात बोलतांना अमित शाह म्हणाले, पुण्याच्या धर्तीवरून मी छञपती शिवाजी महाराजांनी नमन करतो. 17 व्या शतकात इथूनच पेशव्यांनी मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडे लावले. एनडीए हे प्रेरनास्थान हे देशाच्या सुरक्षेच महत्वाचं ठिकाण आहे, म्हणून पेशवा बाजीरावांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणं हे सर्वाधिक उचित ठिकाण आहे.
ते पुढे म्हणाले, बाजीराव पेशवे हे युद्ध कलेत निपून तर होतेच पण त्यांचं शौर्य देखील होत. थोरले बाजीराव पेशवे हे 20 वर्षात 41 युद्ध लढले आणि ते सर्व जिंकले, अशा वीर योद्धाचा पुतळा आज एनडिएत उभारला गेलाय याचा अभिमान वाटतो. छञपती शिवाजी महाराजांनी स्वातंञ्यांची लढाई पुढे नेली नसती तरी कदाचित भारत आपल्या मूळ स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालाच नसता. बाल शिवाजी आणि श्रीमंत बाजीराव पेशवा हे दोन्ही पाञ मला नैराश्यातून बाहेर काढतात. आपल्या शूरवीरांचा इतिहास सर्व भाषांमधे पोहोचवा. विनय सहस्त्रबुद्धे यांनी इतर भाषांमधून इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असं मत व्यक्त केल त्यांनी केवळ सूचना केली सूचना करून फायदा नाही तुम्ही याच्या कामाला सुरुवात करा आम्ही सगळे सोबत आहोत.