शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रस्ते मोकळे असतानाही घटनास्थळी रुग्णवाहिका उशिराच; कोरोनाच्या काळात मानवी संवेदना झाल्या बधीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 17:11 IST

नाना पेठेत वेळेवर रुग्णवाहिका न पोहचल्याने एका रुग्णाला आपला गमवावा लागला प्राण

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणरुग्णालय व्यवस्थापन आणि रुग्णवाहिकेचे चालक यांच्यात नाही समन्वय

पुणे :  नाना पेठेत वेळेवर रुग्णवाहिका न पोहचल्याने एका रुग्णाला आपला प्राण गमवावा लागला. यापूर्वी देखील महर्षीनगर याठिकाणी फुटपाथवर चार तासांहून अधिक काळ पडलेल्या व्यक्तीला शेवटपर्यंत रुग्णवाहिका न्यायला आलीच नाही. एकीकडे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस बिकट होत असताना दुसऱ्या बाजुला शहरातील कटेंनमेंट भागात रुग्णवाहिका पोहचण्यास उशीर होत असल्याचे दिसून आले आहे. एरवी प्रचंड वाहतूक आणि रहदारी असताना देखील रुग्णालयात वेळेवर पोहचणाऱ्या रुग्णवाहिका आता रस्ते मोकळे असूनही घटनास्थळी उशिरा का पोहचत आहेत? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.       कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सरकारी यंत्रणा अधिक प्रभावीपणे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या कटेंनमेंट भागातील स्थिती चिंताजनक असल्याने तेथील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्याभागातील दुकाने पूर्णत: बंद करण्यात आली आहेत. संचारबंदी आहे. केवळ अतिमहत्वाच्या सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. आरोग्यविषयक सुविधा त्यातील एक आहे. मात्र गेल्या काही घटनांमध्ये रुग्णवाहिकांना झालेल्या विलंबामुळे दोघांना प्राण गमवावा लागला आहे. शुक्रवारी नाना पेठेत झालेल्या घटनेमुळे 108 क्रमांकावरील रुग्णवाहिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या कोरोनामुळे शहरात सर्वत्र संचारबंदी, जमावबंदी आहे. वाहतुकीस बंदी आहे. अशावेळी वेळेत घटनास्थळी रुग्णवाहिका पोहचणे गरजेचे असताना त्यांना होणाऱ्या विलंबामुळे रुग्णांना जीव गमावण्याची भीती वाटू लागली आहे.   याबाबत अधिक माहिती देताना घटनास्थळी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, रुग्णवाहिकेचे चालक पोलीस अधिका-यांनाच पेशंटला कुठे न्यावे? याची विचारणा करतात. कोणत्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत याची माहिती पोलिसांना कशी असणार? आपण ज्या रुग्णाला आणण्यासाठी चाललो आहोत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची भीती त्यांना वाटत असल्याचे दिसून आले आहे. 

* कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था...रुग्णालय व्यवस्थापन आणि रुग्णवाहिकेचे चालक यांच्यात समन्वय नाही. वाहनचालकांना कोरोनाचा प्रार्दुभाव होण्याची भीती वाटते. त्यांच्याकडे मास्क, ग्लॉव्हज आहेत. मात्र ते पुरेसे नसून त्यांना कोरोनाचा सामना करण्यासाठी एखादे प्रोफेशनल किट उपलब्ध झाल्यास त्यांची शंका दूर होईल. याशिवाय ज्या रुग्णवाहिका आहेत त्या अद्ययावत असण्याची  गरज आहे. अँम्ब्युलन्स किटची  गरज आहे. कर्मचाऱ्यांनाच पुरेशी सुरक्षिततेची हमी नसल्यास ते काय करणार अशी निरीक्षणे पोलीस अधिका-यांनी नोंदवली आहेत.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल