शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्रग्ज’ प्रकरणी धुनियासोबतच आणखी २ मुख्य सूत्रधार निष्पन्न; पुणे पोलिसांकडून कसून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 13:29 IST

मुख्य आरोपी संदीप धुनियाची गर्लफ्रेंड ड्रग संदर्भातील आर्थिक व्यवहार बघत असल्यासंदर्भातील काही पुरावे पोलिसांच्या हाती

पुणे : पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत पुणे, कुरकुंभ,‎ सांगली आणि दिल्ली येथे छापेमारी करीत तब्बल ३‎ हजार ६०० कोटी रुपयांचे सुमारे १८०० किलो मेफेड्रोन‎ (एमडी) जप्त केले. संदीप धुनिया हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून, सध्या तो देशाबाहेर असल्याचे पोलिस तपासात समोर आले. शनिवारी (ता. २४) संदीप धुनियाबरोबरच आणखी दोन मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले असून, पुणे पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या दोघांविरोधातदेखील पोलिसांनी लूकआउट नोटीस जारी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता

पुणे पोलिसांकडून युद्धपातळीवर आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासोबतच देशविरोधी कारवायांसाठी अमली पदार्थ‎ विक्रीच्या पैशांचा वापर झाला आहे का? यादृष्टीने‎देखील हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणा‎ (एनआयए) किंवा नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (एनसीबी)‎कडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी यावर आक्षेप घेत हा तपास स्वत:कडे ठेवण्याचा आग्रह पोलिस महासंचालकांकडे केल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली.

धुनियाच्या गर्लफ्रेंडचा सहभाग

सध्या या ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धुनिया याची गर्लफ्रेंड ड्रग संदर्भातील आर्थिक व्यवहार बघत असल्यासंदर्भातील काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे तिचादेखील शोध पोलिस घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकDrugsअमली पदार्थMONEYपैसा