शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार, गुरूशिष्यांसह शरद पवारांची राष्ट्रवादी देखील उतरली आखाड्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:06 IST

 ‘माळेगांव’ कारखान्यासाठी तिरंगी लढत, उपमुख्यमंत्र्यांचा ब वर्गातून उमेदवारी अर्ज कायम, काका-पुतणे आमने-सामने, सस्पेन्स वाढला

माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर तीन पॅनल जाहीर झाल्याने तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गुरूशिष्यांनी यापूर्वीच एकमेकांविरोधात शड्डू ठोकले होते. यात गुरुवारी (दि. १२) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील कारखाना निवडणुकीत उडी घेत शड्डू ठोकला. त्यामुळे आता गुरूशिष्यांबरोबरच काका-पुतणे देखील आमनेसामने येण्याचे संकेत आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘ब’ वर्गातून स्वत:ची उमेदवारी कायम ठेवत निवडणुकीचा सस्पेन्स वाढवला आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत सर्वपक्षीय नीलकंठेश्वर पॅनलची यादी तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी जाहीर केली. यावेळी माजी अध्यक्ष केशवराव जगताप, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर व आदी उपस्थित होते.

नीलकंठेश्वर पॅनल उमेदवारगट क्रमांक १ बाळासाहेब तावरे, शिवराज राजे जाधवराव, राजेंद्र बुरुंगले. गट क्रमांक २ तानाजी कोकरे, स्वप्निल जगताप, योगेश जगताप, गट क्रमांक ३ विजय तावरे, वीरेंद्र तावरे, गणपत खलाटे. गट क्रमांक ४ प्रताप आटोळे, सतीश फाळके, गट क्रमांक ५ जयपाल देवकाते, अविनाश देवकाते. गट क्रमांक ६ नितीन सातव, देविदास गावडे, ब वर्ग प्रवर्ग - अजित पवार. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग रतनकुमार भोसले. महिला राखीव संगीता कोकरे, ज्योती मूल-मुले. इतर मागास नितीन शेंडे, भटक्या-विमुक्त जाती व जमाती विशेष मागास- विलास देवकाते.

 चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार

गट क्रमांक १ रंजनकुमार तावरे, संग्राम काटे, रमेश गोफणे. गट क्रमांक २ सत्यजित जगताप, रणजीत जगताप, रोहन कोकरे. गट क्रमांक ३ चंद्रराव तावरे, रणजीत खलाटे, संजय खलाटे. गट क्रमांक ४ मेघश्याम पोंदकुले, विलास सस्ते, गट क्रमांक ५ राजेश देवकाते, केशव देवकाते. गट क्रमांक ६ गुलाबराव गावडे, वीरसिंग गवारे. ब वर्ग प्रवर्ग- भालचंद्र देवकाते. महिला प्रतिनिधी राजश्री कोकरे, सुमन गावडे, अनुसूचित जाती जमाती- बापूराव गायकवाड. इतर मागास प्रवर्ग- रामचंद्र नाळे. भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास-सूर्याजी देवकाते. शरद पवार गटाने सर्वपक्षीय बळीराजा सहकार पॅनल माळेगाव कारखान्यासाठी आज उतरविले. यामध्ये प्रामुख्याने सध्याच्या संचालक मंडळातील सुरेश खलाटे व तानाजी पोंदकुले यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गट क्रमांक १ अमित तावरे, राजेंद्र काटे, श्रीहरी पांडुरंग येळे. गट क्रमांक २ सुशील कुमार जगताप, दयानंद कोकरे, भगतसिंग जगताप, गट क्रमांक ३ संजय तावरे, राजेंद्र जाधव, सुरेश खलाटे. गट क्रमांक ४ सोपानराव आटोळे, तानाजी पोंदकुले. गट क्रमांक ५ गणपत देवकाते, शरदचंद्र तुपे. गट क्रमांक ६ प्रल्हाद वरे, अमोल गवळी. महिला राखीव शकुंतला कोकरे, पुष्पा गावडे. इतर मागासवर्गीय भारत बनकर, ज्ञानदेव बुरुंगले. अनुसूचित जाती-जमाती- राजेंद्र भोसले.अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अनेकांना डच्चू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर या सर्वपक्षीय पॅनलमध्ये विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच अनेक संचालकांना डच्चू देण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने सध्याचे अध्यक्ष पणदरे गटातून केशवराव जगताप, माळेगाव गटातून संजय काटे, सांगवीतून अनिल तावरे, सुरेश खलाटे, खांडज-शिरवलीतून बन्सी आटोळे, निरावागज गटातून अध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मदनराव देवकाते, तानाजी देवकाते, बारामती गटातून राजेंद्र ढवाण आदींचा समावेश आहे. तर बाळासाहेब तावरे, योगेश जगताप, स्वप्नील जगताप, तानाजी कोकरे, संगीता कोकरे, प्रताप आटोळे व नितीन सातव तसेच माजी संचालक राजेंद्र बुरुंगले, अविनाश देवकाते व विलास देवकाते यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस