शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील दुकानांना रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 12:47 PM

पुणे शहर व्यापारी संघाची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महापालिका आयुक्तांकडे मागणी

ठळक मुद्देरात्री १० पर्यंत परवानगीबाबत महापौरांचे आयुक्तांना पत्र

पुणे : शासनाने हॉटेल व बार यांना रात्री दहावाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, असे असताना किराणामाल, फळे, कपडे, जनरल स्टोअर यांना सायंकाळी सातपर्यंत मर्यादा घातली आहे. सणासुदीच्या काळात ही मर्यादा अन्यायकारक असून, सर्वच व्यवसायांना रात्री ९ पर्यंत पालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी राजकीय पक्षांसह ,व्यापारी वर्गातून पुढे आली आहे. 

शहरातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ टेड असोसिएशन ऑफ पुणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. आगामी काळातील नवरात्र व दिपावली या सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील दुकाने १७ ऑक्टोबर पासून रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पुणे शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी केली आहे़.

रात्री १० पर्यंत परवानगीबाबत महापौरांचे आयुक्तांना पत्रसणासुदीचे दिवस असल्याने सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी द्यावी असे पत्र महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना गुरुवारी रात्री दिले आहे. राज्य शासनाने ५ ऑक्टोबरपासून शहरातील हॉटेल व बार रात्री १० पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिलीं आहे. 

आढावा बैठकीकडे लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज ( शुक्रवारी ) होणाऱ्या आढावा बैठकीत सर्व दुकाने , व्यवसायांना रात्री ९ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी मिळणार का  याकडे व्यापारी वर्गाचे लक्ष असणार आहे. सणासुदीच्या काळात गर्दी टाळण्यासाठी दुकानांना अधिकची वेळ देणे योग्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. 

.

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तNavratriनवरात्रीDiwaliदिवाळी