शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांना श्रद्धांजली म्हणून पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने उद्या दिवसभर बंद; व्यापारी महासंघाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:53 IST

जनतेच्या सेवेसाठी अविरत कार्य करणारा एक कर्तव्यदक्ष, परखड आणि प्रभावी नेता आज आपल्यातून निघून गेला, ही संपूर्ण महाराष्ट्रासह पुण्यातील व्यापारी बांधवांसाठी अपरिमित हानी आहे

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक अपघाती दुःखद निधनामुळे पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने गुरुवार दि. २९/०१/२०२६ रोजी संपूर्ण दिवस बंद राहणार असल्याची माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी नोटीस जरी करून दिली आहे. 

अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!

 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री, लोकनेते श्री. अजित दादा पवार यांच्या आकस्मिक व दुर्दैवी निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी व धक्कादायक आहे. जनतेच्या सेवेसाठी अविरत कार्य करणारा एक कर्तव्यदक्ष, परखड आणि प्रभावी नेता आज आपल्यातून निघून गेला, ही संपूर्ण महाराष्ट्रासह पुण्यातील व्यापारी बांधवांसाठी अपरिमित हानी आहे. श्री. अजित दादा पवार यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात राज्याच्या विकासासाठी, प्रशासनातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी उद्योग. व्यवसाय व व्यापारी वर्गाच्या प्रश्नांकडे नेहमीच सकारात्मक दृष्टीने पाहून निर्णय घेतले. पुणे शहर व जिल्ह्याच्या विकासात पायाभूत सुविधा, अर्थकारण आणि व्यापारी हितसंबंध यासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून ते सदैव स्मरणात राहील.

या दुःखद प्रसंगी पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांप्रती, आप्तस्वकीयां प्रती व असंख्य समर्थकांप्रति आम्ही मनःपूर्वक शोक संवेदना व्यक्त करतो. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व या कठीण काळात कुटुंबीयांना आणि अनुयायांना दुःख सहन करण्याचे बळ देव हीच प्रार्थना. मा. श्री. अजित दादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून गुरुवार दि. २९/०१/२०२६ रोजी पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने संपूर्ण दिवसभर बंद राहतील असा निर्णय पुणे व्यापारी महासंघातर्फे घेण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Shops Closed as Tribute to Ajit Pawar: Traders' Association

Web Summary : Pune's traders will shut down shops on January 29, 2026, to honor the late Ajit Pawar, Maharashtra's Deputy Chief Minister. The Pune Traders' Association announced this closure, expressing grief over Pawar's sudden demise and acknowledging his contributions to the city's development and the business community.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDeathमृत्यूMaharashtraमहाराष्ट्रPlane Crashविमान दुर्घटनाbusinessव्यवसायNCPराष्ट्रवादी काँग्रेस