शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

आंबेगाव तालुक्यातील मीना नदीत बुडालेल्या तीनही मुलांचे मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 1:17 PM

हे तिघेही रविवारची सुटी असल्याने मीना नदीत पोहायला गेले होते...

निरगुडसर : आंबेगाव तालुक्यातील शिंगवे (पारगाव येथील वाडीमळ्यातील) येथील मीना नदीपात्रात रविवारी बुडालेल्या तिन्ही मुलांचे मृतदेह शोधण्यास एनडीआरएफच्या पथकाला सोमवारी यश आले. रविवारी (दि. २९) दुपारी ही घटना घडली होती.  वैभव चिंतामण वाव्हळ (वय १६), श्रेयश सुधीर वाव्हळ (वय १५), प्रणव राजेंद्र वाव्हळ (वय १५, सर्व रा. शिंगवे पारगाव) अशी बेपत्ता मुलांची नावे होती. हे तिघेही रविवारची सुटी असल्याने मीना नदीत पोहायला गेले होते. बराच वेळ होऊनही ते घरी न आल्याने घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली.  नदीच्या बाजूला त्यांचे कपडे आढळल्याने त्यांनी नदीपात्रात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुले सापडली नसल्याने एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. रविवारी रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. मात्र, पथकाने सोमवारी सकाळी मुले पोहत असलेल्या ठिकाणी शोध घेतला. तासाभरात या तिन्ही मुलांचे मृतदेह सापडले. तीनही मुले एकुलती असल्यामुळे या मुलांच्या मृत्यूने वाव्हळ कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे सोमवारी शिंगवे गाव बंद ठेवले. तिघेही येथील भैरवनाथ विद्यालयात शिक्षण घेत होती.  विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. संबंधित कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होऊन त्या कुटुंबीयांना धीर देत त्या  कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी त्यांच्यासमवेत मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम व अनेक मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :ambegaonआंबेगावdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूriverनदी