पुणे महापालिकेत गळत्या छतावरून रणकंदन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 12:22 IST2018-06-28T12:08:16+5:302018-06-28T12:22:46+5:30

पुणे पालिकेच्या नव्या इमारतीच्या गळती विरोधात सर्व पक्षांच्या सदस्यांनी पालिकेतील सभागृहात छत्र्या घेऊन आंदोलन केले.

All Political parties agitation at Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेत गळत्या छतावरून रणकंदन !

पुणे महापालिकेत गळत्या छतावरून रणकंदन !

पुणे -  पुणे पालिकेच्या नव्या इमारतीच्या गळती विरोधात सर्व पक्षांच्या सदस्यांनी पालिकेतील सभागृहात छत्र्या घेऊन आंदोलन केले. सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी सर्वपक्षीय सभासदांनी घोषणाबाजी करून सभा दणाणून सोडली. पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनावेळी झालेल्या जोरदार पावसामुळे भर कार्यक्रमात सभागृह गळायला सुरुवात झाली. या गळतीविरोधात सर्व पक्षांच्या सदस्यांनी पालिकेतील सभागृहात छत्र्या घेऊन सत्ताधारी भाजपाचा निषेध करत आंदोलन केले.

नव्या इमारतीतील गळतीवर चर्चा झालीच पाहिजे  असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने इमारत गळतीविरोधात छत्र्या घेऊन जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. तसेच या निकृष्ट कामाला जबाबदार ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी सर्व पक्षीय सदस्यांनी केले.

Web Title: All Political parties agitation at Pune Municipal Corporation