Alandi Nagar Parishad Election Result 2025: आळंदी नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता; नगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे मोठ्या फरकाने विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:18 IST2025-12-21T15:17:41+5:302025-12-21T15:18:06+5:30

Alandi Nagar Parishad Election Result 2025 शिवसेनेच्या शिंदे गटाला ४, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले

Alandi Nagar Parishad Election Result 2025 BJP single handed power over Alandi Municipal Council; Prashant Kurhade wins by a large margin as Mayor | Alandi Nagar Parishad Election Result 2025: आळंदी नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता; नगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे मोठ्या फरकाने विजयी

Alandi Nagar Parishad Election Result 2025: आळंदी नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता; नगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे मोठ्या फरकाने विजयी

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासह एकूण १५ जागा खेचून आणत विरोधकांचा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. नगराध्यक्ष पदाच्या चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे उमेदवार प्रकाश पंढरीनाथ कुऱ्हाडे यांचा तब्बल ६ हजार ६९० मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. प्रशांत कुऱ्हाडे यांना एकूण १२ हजार ७२४ मते मिळाली, तर प्रकाश कुऱ्हाडे यांना ६ हजार ३४ मते मिळाली. या विजयाने आळंदी पालिकेवर भाजपचे कमळ फुलले असून, एकूण १५ जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला ४, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि अपक्ष उमेदवारांना या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.

​प्रभागनिहाय निकालांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवले आहेत. प्रभाग २ (अ) मध्ये भाजपच्या वैजयंता अशोक उमरगेकर यांनी १८६२ मते मिळवत १५४८ मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. प्रभाग ५ (ब) मध्ये भाजपच्या खुशी सागर बोरुंदिया यांनी १७०२ मते घेत १२९७ मतांच्या फरकाने बाजी मारली. प्रभाग ८ (अ) मधून भाजपचे सचिन रामदास गिलबिले ९६४ मतांच्या फरकाने, तर प्रभाग ७ (ब) मधून सुनील ज्ञानेश्वर घुंडरे ७२६ मतांच्या फरकाने विजयी झाले. प्रभाग ४ (ब) मध्ये भाजपचे गोविंदा उर्फ सागर कुऱ्हाडे ५५४ मतांनी, तर प्रभाग ५ (अ) मध्ये संतोष मारुती रासकर ५३३ मतांनी निवडून आले. प्रभाग ६ (अ) मध्ये साक्षी अक्षय कुऱ्हाडे (४६६ मते), प्रभाग ९ (अ) मध्ये दिनेश रामदास घुले (४३३ मते) आणि प्रभाग २ (ब) मध्ये रामचंद्र दत्तात्रय भोसले (३४९ मते) यांनी दणदणीत विजय मिळवला.

​याव्यतिरिक्त, प्रभाग १० (ब) मध्ये भाजपच्या ऋतुजा अनिकेत तापकीर २३१ मतांनी, प्रभाग ६ (ब) मध्ये हेमंत गुलाबराव कुऱ्हाडे १६८ मतांनी, प्रभाग ४ (अ) मध्ये कांचन किरण येळवंडे १५४ मतांनी, प्रभाग ३ (अ) मध्ये पूजा संजय घुंडरे ७५ मतांनी आणि प्रभाग ३ (ब) मध्ये सोमनाथ कुंडलिक कुऱ्हाडे ५१ मतांच्या निसटत्या फरकाने विजयी झाले. प्रभाग ८ (ब) मधून भाजपच्या सुजाता कालिदास तापकीर या आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.
​             
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनीही काही प्रभागांत वर्चस्व दाखवले. प्रभाग १ (अ) मधून पती- पत्नी निवडून आले आहेत. ऋतुजा आदित्य घुंडरे ६०३ मतांनी, तर प्रभाग १ (ब) मधून आदित्य हनुमंत घुंडरे ५५७ मतांनी विजयी झाले. प्रभाग १० (अ) मध्ये सुरेश खंडेराव झोंबाडे यांनी २५९ मतांनी, तर प्रभाग ७ (अ) मध्ये अरुणा ज्ञानेश्वर घुंडरे यांनी १२० मतांच्या फरकाने विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने प्रभाग १० (क) मध्ये उज्वला दीपक काळे यांनी ६९९ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर प्रभाग ९ (ब) मध्ये अर्चना विजय तापकीर यांनी केवळ २५ मतांच्या फरकाने विजय खेचून आणला. दरम्यान प्रशांत कुऱ्हाडे यांच्या रूपाने आळंदीला नवा नगराध्यक्ष मिळाल्याने शहरभर भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. 

Web Title : आलंदी नगर परिषद चुनाव में भाजपा का दबदबा; प्रशांत कुऱ्हाडे अध्यक्ष निर्वाचित

Web Summary : आलंदी नगर परिषद चुनावों में भाजपा ने 15 सीटें जीतकर भारी जीत हासिल की। भाजपा के प्रशांत कुऱ्हाडे ने अध्यक्ष पद पर महत्वपूर्ण अंतर से जीत हासिल की। शिवसेना शिंदे गुट ने 4 सीटें और एनसीपी (अजित पवार) ने 2 सीटें जीतीं। जश्न मनाया गया।

Web Title : BJP Dominates Alandi Nagar Parishad Election; Prashant Kurhade Elected President

Web Summary : BJP secured a landslide victory in Alandi Nagar Parishad elections, winning 15 seats. Prashant Kurhade of BJP won the President post by a significant margin. Shivsena Shinde faction won 4 seats and NCP (Ajit Pawar) won 2. Celebrations erupted.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.